murder casecrime case- पैशाच्या देवघेवीतून वडणगे पोवार पाणंद परिसरातील बंडगर मळ्यात फुलेवाडी रिंगरोडवरील गंधर्वनगरीतील रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात (murder) आला. योगेश मनोहर शिंदे (वय ३२) असे त्याचे नाव आहे. आज सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संशयित रिक्षाचालक दीपक रघुनाथ पोवार (३५, मूळ राहणार सोमवार पेठ, सध्या राहणार शिवाजी उद्यमनगर) व सागर दत्तात्रय चौगुले (३०, आयटीआय म्हाडा कॉलनी, संभाजीनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

योगेश आई, पत्नी व मुलासह कोंडाओळ परिसरात वास्तव्यास होता. तो सध्या गंधर्वनगरीत राहत होता. त्याचा रिक्षा व्यवसायावर उदरनिर्वाह चालत होता. त्याचे रिक्षाचालक दीपक व सागर हे जिवलग मित्र. संचारबंदीच्या काळात त्यांची आर्थिक अडचण होती. त्यामुळे दोघांनी योगेशकडून पन्नास हजार रुपये घरखर्चासाठी उसने घेतले होते. योगेशला पैशांची गरज असल्याने तो दिलेल्या पैशांची मागणी दोघांकडे वारंवार करत होता.  (crime case)

मात्र, दोघांकडून पैसे देण्याला प्रतिसाद मिळत नव्हता. वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीपुढे ते वैतागले होते. त्यामुळे दोघांनी त्याला आज पार्टीसाठी वडणगे रोडपासून जवळ असणाऱ्या बंडगर मळ्यात नेले. तिघांनी मद्यप्राशन केल्यानंतर त्यांच्यात पैशाचा विषय पुन्हा सुरू झाला. त्यातून शाब्दिक चकमक होऊन वाद विकोपाला पोचला.

दोघे वाद करत असल्याची माहिती त्याने पत्नीला फोनवरून दिली. त्यातून दोघे योगेशवर अधिकच चिडले. त्यातून त्याच्यावर दगडाने हल्ला झाला. त्यातच त्याचा खून (murder) झाला.वादावादीचा प्रकार रस्त्यावरून जाणाऱ्या ग्रामस्थांनी पाहिला. सरपंचांनी त्याची माहिती करवीर पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर, सहायक पोलिस निरीक्षक अरविंद कांबळे, पोलिस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात, विक्रांत चव्हाण तत्काळ घटनास्थळी पोचले. त्यांनी दीपक व सागरला ताब्यात घेतले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवला. 

पोलिस घटनास्थळी पोचल्यानंतर त्यांना योगेशचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. तेथेच कोल्हापुरी चपलांचा जोड व मद्याच्या बाटल्या पडल्या होत्या. या प्रकाराची माहिती वाऱ्यासारखी वडणगे परिसरात पसरली. काही ग्रामस्थ रोडवर घडलेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी थांबले होते.