ajit pawar played cricket match


राजकारणाच्या मैदानात  (politics) सडेतोड टोलेबाजी करण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचा चांगलाच हातखंड आहे. अजित पवारांच्या फटकेबाजीमुळे चांगले चांगले गारद झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. आता आपल्या होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये अजितदादांचा क्रिकेटच्या मैदानात (cricket match) शानदार बॅटिंग करताना पाहण्यास मिळाले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भरवण्यात आलेल्या बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर क्रिकेट सामन्याच्या ठिकाणी भेट दिली.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


आता अजित पवार खुद्द मैदानात आल्यामुळे कार्यकर्त्यांनी अजितदादांना बॅटिंग करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांनी केला. कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यामुळे अजितदादांनीही बॅट हातात घेतली. उचलून मारा असं म्हणत कार्यकर्त्यांनी अजितदादांच्या नावांनी एकच घोषणाबाजी केली. मग काय, अजितदादांनीही मोठ्या उत्साहाने आलेला बॉल चांगलाच टोलावला.

तर दुसरीकडे अजित पवार यांचा पुतण्या रोहित पवार यांचा बॅटिंगचा (cricket match) व्हिडिओ समोर आला आहे. नाशिक दौऱ्यावर असताना रोहित पवार यांनी जोरदार बॅटिंग करत शानदार षटकार लगावला.

'मी आज आमदार म्हणून आलेलो नाही. नागरिक, कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील रोहित पवार यांनी केलं आहे. ते म्हणाले, मी पदाधिकाऱ्यांना याबाबत सुचना दिल्या होत्या. मात्र, अनेक कार्यकर्ते इथे आले, मी सांगितलं मास्क लावा मात्र त्यांनी ऐकलं नाही. मास्क लावा, स्वत: ची काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.