cricket-harbhajan-singh-got-troll-on-social-media

(Cricket Live Score) मागचा काही काळ क्रिकेटपासून लांब असलेला हरभजन सिंग (Harbhajan Singh) सोशल मीडियावर सक्रीय आहे. क्रिकेटपासून सामाजिक मुद्द्यांवर हरभजन त्याचं मत मांडतो, पण यावेळी कोरोना लसीबद्दल (Corona Vaccine) केलेल्या एका ट्विटमुळे हरभजन सिंगवर निशाणा साधण्यात येत आहे.

हरभजन सिंगने वेगवेगळ्या कोरोना लसीच्या यशाची टक्केवारी ट्विटरवर शेयर केली. या टक्केवारीपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी जास्त असल्याचं हरभजन म्हणाला. हरभजनच्या या ट्विटवर अनेकांनी आपली नाराजी जाहीर केली.

'फायजर आणि बायोकेट लसीची ऍक्युरसी 94 टक्के, मॉर्डना लसीची ऍक्युरसी 94.5 टक्के, ऑक्सफर्ड लसीची ऍक्युरसी 90 टक्के. भारताचा रिकव्हरी रेट (लस न घेता) 93.6 टक्के. भारताला खरचं लसीची गरज आहे?', असं ट्विट हरभजनने केलं.

हरभजनच्या या ट्विटवर आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा (Rupin Sharmaयांनीही प्रतिक्रिया दिली. 'जर भारतीय क्रिकेट टीममधल्या (Cricket Live Score) सगळ्यांना मॅन ऑफ द मॅच दिलं तर भारत सगळ्या मॅच जिंकेल. आकडे योग्य कसे असतात, हे फक्त त्याच क्षेत्रात असलेली व्यक्ती जाणू शकते,' असं रुपीन शर्मा म्हणाले.

देशात कोरोना रुग्णांची संख्या 95 लाखांच्या पुढे गेली आहे, यातले 89.73 लाख रुग्ण कोरोनातून बरे झाले, त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या 94.11 टक्के झाली आहे. गुरुवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात कोरोनाचे 35,551 रुग्ण समोर आले, त्यामुळे एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 95,34,964 एवढी झाली. एका दिवसात 526 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांची संख्या 1,38,648 झाली आहे. देशात मृत्यूदर 1.45 टक्के एवढा आहे. तर सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,22,943 एवढी म्हणजेच 4.44 टक्के एवढी आहे.