court-issues-notice-to-raj-thackeray


political news headlines- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अॅमेझॉन (amazon)  वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. मनसेनं अॅमेझॉनविरोधात मराठी भाषेवरुन एक मोहीम सुरु केली आहे. त्यावर अॅमेझॉन कोर्टात गेलं. त्यावरुन दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात आलीय. त्यांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. (court issues notice to Raj Thackeray)

मनसेची मोहीम सुरुच राहणार

अॅमेझॉनवर (amazon) मराठी भाषेचा पर्याय सुरु करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अॅमेझॉनकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असं असलं तरी मनसेची ही मोहीम सुरुच राहील. कारण ही मोहीम मराठी माणसांची, मराठी भाषेसाठी आहे. तसंच कोर्टानं जी नोटीस दिली आहे. त्यावरुन आता अॅमेझॉनला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिलाय.

----------------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

2) मराठा समाजाला राज्य सरकारचा दिलासा

3) SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज!

4) हेअरकटनंतर व्हायरल झाला फोटो, तब्बल 10 वर्षांनंतर झाली कुटुंबीयांची भेट

5) सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

6) मलम लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

--------------------------------------------------------

अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अ‍ॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. (political news headlines)

यापूर्वी मनसेकडून अ‍ॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.

मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल

amazon vs mns


अ‍ॅमेझॉन’च्या डिजिटल सेवेत मराठीला प्राधान्य देण्याच्या मनसेच्या आग्रही मागणीची अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांच्या प्रतिनिधींनी दखल घेतली होती. जेफ बेझॉस यांना तुमचा ईमेल मिळाला आहे. अ‍ॅमेझॉन अ‍ॅपबाबत तुम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. संबंधित टीमला आम्ही याची माहिती दिल्याचा ई-मेल अ‍ॅमेझॉनकडून पाठवण्यात आला होता. त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’चं शिष्टमंडळ मुंबईत आले होते.