corona-vaccine-human-challenge-trial-in-england

(Corona Virus) प्रत्येक जण कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचावाचा प्रयत्न करत आहे, सरकार प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे, नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देत आहे. डॉक्टरही नागरिकांना कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी सल्ले देत आहेत. कोरोना शरीरात जाण्यापासून रोखण्यासाठी जे जे काही करता येईल ते सर्वकाही केलं जातं आहे. असं असताना यूकेमध्ये (UK) मात्र लोक मुद्दामहून कोरोना पॉझिटिव्ह (corona positive) होणार आहेत.

पुढील महिन्यात लंडनमध्ये ह्युमन चॅलेंज ट्रायल (human challenge studies)  होणार आहे. रॉयल फ्री रुग्णालयात हे ट्रायल होणार आहे. जवळपास  2500 लोक या ट्रायलमध्ये सहभागी होणार आहे. 18  ते 30 वयोगटातील लोक या ट्रायलमध्ये सहभागी होणार आहे.

या ट्रायलमध्ये निरोगी लोकांना कोरोना पॉझिटिव्ह केलं जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. या लशीचा परिणाम तपासला जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोरोना लस दिली जाणार आहे. लस दिल्यानंतर दोन ते तीन आठवडे त्यांना मॉनिटर केलं जाईल.

माहितीनुसार अठराव्या शतकात अशा पद्धतीचं ट्रायल सुरू करण्यात आलं. (Corona Virus) शास्त्रज्ञ एडवर्ड जेनर यांनी लशीचा प्रभाव तपासण्यासाठी एका व्यक्तीला व्हायरस संक्रमित केलं होतं आणि त्यानंतर ही लस प्रभावी असल्याचं दिसून आलं होतं. याआधी मलेरिया, टायफॉईड आणि फ्लूसारख्या आजारांवरही प्रयोग करण्यात आला आहे.

जगभरात सध्या वेगवेगळ्या कोरोना लशींचं ट्रायल सुरू आहे. त्यापैकी काही कोरोना लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहे. मोजक्यात लशी क्लिनिक ट्रायलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. त्यापैकी तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असलेल्या कोरोना लशीच्या आपात्कालीन वापरासाठी अर्जही करण्यात आले आहेत. अमेरिकेतील फायझरच्या कोरोना लशीला यूकेमध्ये परवानगी देण्यात आली आहे. भारतातही फायझर, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्राझेनेका-सीरम इन्स्टिट्युट आणि हैदराबादच्या भारत बायोटेकनंही आपल्या कोरोना लशीला आपात्कालीन वापरासाठी मंजुरी द्यावी यासाठी अर्ज केला आहे.