satej patilकोल्हापूर  (kolhapur) जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी मोठी घोषणा केली आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक (Kolhapur Municipal election) महाविकास आघाडीतील (Maha vikas aaghadi) सर्व पक्ष वेगळे लढणार असल्याचं म्हटलंय. मात्र निवडणुकीनंतर (municipal election) एकत्र येणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं आहे. कोल्हापूर महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉंग्रेसकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडे उमेदवारी मागण्यासाठी गर्दी होत आहे. आज सकाळीच त्यांच्या बावडा येथील निवासस्थानी अनेकांनी भेट घेऊन इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी सतेज पाटील यांनी आम्ही महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहोत, मात्र निवडणुकीनंतर एकत्र येणार असल्याचे जाहीर केले.

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

कोल्हापूर महापालिका प्रस्ताविक आहे. मागील वर्षी महानगरपालिका निवडणुकीत (municipal election) विविध पक्षांमध्ये चुरस होती. स्वतंत्र निवडणूक लढणार असं शिवसेना आणि राष्ट्रवादीनं जाहीर केलं आहे. काँग्रेसही स्वतंत्र निवडणूक लढवेल, आम्ही आमचा निर्णय वरिष्ठांना कळवणार आहे. महाविकास आघाडी नक्की महापालिकेवर सत्ता स्थापन करेल, असं सतेज पाटील म्हणाले.

महापालिका निवडणूक काँग्रेसकडून लढण्यासाठी अनेक उमेदवार उत्सुक आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्ष वेगळे लढणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर आम्ही सर्व एकत्र येऊ, असं सतेज पाटील यांनी नमूद केलं.