politics news of maharashtrapolitics news of maharashtra- राज्यातील 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. या 6 जागाही आम्हीच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil)यांनी केला आहे. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर पुण्याची जागा एका हाती जिंकणार पाटील यांनी म्हटलं.

--------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. 'पुणे पदवीधर मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे', असा टोला चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लगावला आहे.(politics news of maharashtra)

पदवीधरचा आमदार असताना आपण केलेल्या कामाची यादी मोठी असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केलाय. विरोधकांना मुद्दाच नाही. झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नसल्याची टीका पाटील यांनी महाविकास आघाडीवर केलीय. पुणे पदवीधर हा 36 वर्षे आमचा गड राहिला आहे. आताही तो कामय राहिल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.