center-should-play-role-wisdom-sharad-pawar

पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्यांची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी. अन्यथा या आंदोलनाचे लोण देशभर पसरेल आणि लोक आपल्या पद्धतीने या प्रश्नाची सोडवणूक करतील. तसे झाल्यास ते केंद्र सरकारच्या हिताचे ठरणार नाही, त्यामुळे केंद्र सरकारने शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी. मात्र, अद्याप तशी भूमिका घेतल्याचे दिसत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  ( Sharad Pawar) यांनी रविवारी शेतकरी आंदोलनाबाबत केंद्राला फटकारले.

_______________________

Must Read

1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर

2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले

3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल

5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार या हिंदी चित्रपटात

6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

______________________________  


शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे शरद पवार यांनी राऊत यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, केंद्र सरकारने कृषी विधेयक अत्यंत घाईघाईने संसदेत संमत करून घेतली. त्यामुळेच  सरकारला आता शेतकऱ्यांच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागत आहे. सरकारने यावर चर्चा करावी, सर्वांशी बोलावे, एकत्र बसून निर्णय करावा, अशी मागणी केली होती. मात्र सरकारने ऐकले नाही.  

कृषी कायदा काहीही झाले तरी रद्द होणार नाही. त्यात फक्त बदल केला जाईल. तसेच शेतमाल कुठेही विकता येणार आहे तर आंदोलनाचा आग्रह कशासाठी? देशात लोकशाही असल्याने राष्ट्रपतींना कोणीही भेटू शकते. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आमच्या सर्वांना शुभेच्छा.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष भाजप 

खंदक खोदून राज्यांच्या सीमेवर शेतकऱ्यांना अडविण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप सरकारला शेतकरी म्हणजे दहशतवादी वाटले का? केंद्रातील सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी ठरवत आहे. त्यांना राजधानीत जाण्यापासून रोखले जात आहे. 
स्वाभिमानी शेतकरी संघटना 

दिल्लीत आंदोलन करण्यासाठी जे लोक गोळा झाले आहेत, हे सर्व भामटे लोक आहेत. दिल्लीचे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झाले आहे. 
    - रघुनाथदादा पाटील, शेतकरी संघटनेचे नेते  

महाविकास आघाडीचा  ‘भारत बंद’ला पाठिंबा

शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला प्रदेश काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तसेच राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी रविवारी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्रातील भाजप सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याचे चित्र दिसत आहे.

केंद्राचे कृषी कायदे फायद्याचे - फडणवीस

कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. आंदोलनातील काही गटांना आंदोलन असेच चालू ठेवायचे असून त्यावर तोडगा काढायचा नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे माहिती असूनही राजकीय विरोधासाठी काहीजण झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केला.

उद्या राज्यातील बाजार समित्या बंद
८  डिसेंबरच्या देशव्यापी संपात राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या सहभागी होणार आहेत. त्यात माथाडी कामगार, व्यापारी सहभागी होणार आहेत.