new corona strainnational news-  जगभरातची चिंता आणि भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुपाची दहशत जगभरात पसरली आहे. त्यातून ब्रिटेन आणि इंग्लंडहून भारतात परतलेले लोक आता कोरोना पॉझिटिव्ह (new corona strain) आढळून येत असल्यानं भारतात देखील नव्या कोरोनाच्या रुपाचा शिरकाव होतोय की काय अशी शंका उपस्थित होत आहे. नागपुरात इंग्लडहून परत आलेल्या एका तरुणाचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता महाराष्ट्राच्या वेशीवर असलेल्या गोव्यातून एक मोठी बातमी आहे.

गोव्यात 9 ते 20 डिसेंबरदरम्यान ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांपैकी 11 जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे गोव्यासह महाराष्ट्रातील आरोग्य प्रशासनानं अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे नव्या कोरोनाचा स्टेन या प्रवाशांमध्ये आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी त्याचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

9 ते 20 डिसेंबरदरम्यान ब्रिटनवरून 979 प्रवासी भारतात आले होते. नव्या गाईडलाईन प्रमाणे या नागरिकांच्या rt-pcr चाचण्या घेण्यात आल्या त्यापैकी 11 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सर्व 11 रुग्णांना आरोग्य प्रशासनाने निगराणी खाली ठेवला असून त्यांचे नमुने पुण्याच्या नॅशनल व्हायरालॉजी लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. याबाबत प्रशासन सतर्क झाले. त्यादृष्टीनं नियोजन आणि उपाययोजना करण्याचा विचार सुरू (national news) आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात कल्याण, नागपूर आणि रत्नागिरीमध्ये देखील परदेशातून आलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे रिपोर्ट पुण्यातील लॅबमध्ये तपासणीसाठी देण्यात आले असून ठाकरे सरकारसमोरची आणखीन डोकेदुखी वाढणार आहे.