crime- Briberycrime - डॉक्टर कडून छापा न टाकण्यासाठी तब्बल दहा लाखाची लाच घेताना (Bribe) प्राप्तिकर विभागाचा निरीक्षक आज लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात (corruption)अडकला. 

प्रताप महादेव चव्हाण (वय ३४) रा. राजारामपुरी कोल्हापूर असे या निरीक्षकाचे नाव आहे. आज दुपारी लक्ष्मीपुरी परिसरातील विल्सन फुलावर चव्हाणला दहा लाख रुपये घेताना पकडले.

----------------------------------------------------

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

-----------------------------------------------------------------

शहरातील डॉक्टर विरोधात अज्ञात व्यक्तीने प्राप्तिकर विभागाकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या अनुषंगाने प्राप्तीकर विभागाकडून संबंधित डॉक्टरांची चौकशी सुरू होती. या चौकशी दरम्यान घरावर छापा टाकण्याचा इशारा निरीक्षक चव्हाण यांनी दिला होता. हा छापा टाका यासाठी डॉक्टरने चव्हाण यांना विनंती केल्यानंतर यासाठी सुरुवातीला चव्हाण यांनी 25 लाख रुपयाची लाच (corruption) मागणी केली. शेवटी हा व्यवहार 14 लाख रुपये असा ठरला. (crime)

काल मध्यरात्रीपासून ही तडजोड सुरू होती. त्याच दरम्यान संबंधित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क साधून तक्रार दिली. ठरलेल्या रकमेपैकी दहा लाख रुपये आज देण्याचे ठरले (Bribe) होते. ही रक्कम घेताना चव्हाण याला लातूर विभागाने अटक केली. कारवाईच्या भीतीने इतरांच्या पोटात गोळा आणणाऱ्या प्राप्तिकर विभागातील निरीक्षकाला लाच स्वीकारताना पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.