crime news robberycrime news-
सध्या समाजात अनेक गुन्हेगारीच्या घटना घडताना दिसत आहेत. यात प्रशासन एकीकडे कोरोना सारख्या समस्येशी तोंड देत असताना अशा समाजविघातक कामामुळे सामाजिक सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अनेक ठिकाणी चोऱ्या (robbery), दरोडे आदी प्रकार सध्या समाजात होताना दिसत आहेत. आता अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. वर्ध्यात आज मुथुट फायनान्सच्या शाखेवर दिवसाढवळ्या दरोडा पडला.

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

दरोडेखोरांनी ३ लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटून पोबारा केला. हा दरोडा सकाळी ९ वाजून ५ मिनिटांनी पडला.(crime news)

दरोडेखोरांनी (robbery) शस्त्रांचा धाक दाखवून तीन लाख १८ हजार रुपयांची रोकड आणि साडेतीन किलो सोने लुटले. लुटीनंतर त्यांनी कर्मचाऱ्यांच्या दुचाकीवरून पोबारा केला. दरोडेखोराने बँक (bank)व्यवस्थापकांच्या कमरेला पिस्तूल लावले आणि चेंबर पेटीतून लाखोंची रोकड लंपास केली.

ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या दरोड्याची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.