Drugs case bollywoodDrugs case- बॉलीवूडच्या (bollywood) ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात एनसीबीला मोठं यश प्राप्त झाले आहे. या प्रकरणात एनसीबीला 100 हून अधिक गॅजेट्सचा डेटा रिट्राइव्ह करण्यात यश आले असून गांधीनगर येथील फॉरेंसिक सायन्स लॅबोरेटशनने (एफएसएल) हा सर्व डेटा रिट्राइव्ह केला आहे. विशेष म्हणजे, यात बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री आणि अभिनेत्यांसह काही ड्रग्ज पेडलर यांचा गॅजेट्सचा समावेश असून तब्बल 500 एचडी मूवी इतका मोठय़ा प्रमाणात हा डेटा आहे. यामुळे कोणता ड्रग्ज पेडलर (drugs case inquiry) कोणत्या अभिनेत्यांच्या संपर्कात आला होता, याची माहिती उघड होण्यास मदत होणार असल्याने अनेक कलाकारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

-------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

अभिनेता सुशांत सिंग राजपूत (sushant singh rajput) आत्महत्या प्रकरणात समोर आलेल्या बॉलीवूडच्या ड्रग्ज कनेक्शन प्रकरणात सध्या एनसीबीकडून तपास सुरु आहे. याप्रकरणी एनसीबीने अनेक ड्रग्ज पेडलरला अटक केली असून अभिनेत्री दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रिया चक्रवर्ती यांच्यासह अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याच्या प्रेयसीची चौकशी केली आहे. या चौकशी दरम्यान पोलिसांनी अनेक गॅजेट्स जप्त केले होते. 

या गॅजेट्सचा डेटा रिट्राइव्ह करण्यासाठी एनसीबीने हे सर्व गॅजेट्स गांधीनगर येथ्ली फॉरेंसिक सायन्स लेबोटरीकडे पाठविले होते. ज्यात एफएसएलला दोन हार्ड डिस्क भरेल इतका डेटा प्राप्त झाला आहे. या डेटामध्ये गेल्या दोन वर्षांपासूनचे व्हॉटस अॅप चॅट, पह्न का@ल्सची तपशील माहिती, व्हिडीओ आणि इतर क्लिपिंगचा समावेश आहे. एफएसएलकडून आतापर्यंत 30 मोबाईल पह्नचा डेटा रिट्राइव्ह केला असून ज्यातील 10 पह्न हे अभिनेता अर्जुन रामपाल, त्याची प्रेयसी आणि तिच्या भावाचे आहेत. त्याशिवाय आणखीन 70 मोबाईल पह्नची तपासणी शिल्लक असून लवकरच त्यांचा ही डेटा रिट्राइव्ह केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

करण जोहर याच्या घरी 2019 मध्ये झालेल्या पार्टीमध्ये ड्रग्ज वापर केल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. या पार्टीचा व्हिडीओ एफएसएलने तपासून पाहिला असून या प्रकरणी करण जोहरला क्लिन चिट देण्यात आली आहे. या व्हिडीओत कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज मिळालेले नसून या व्हिडीओमध्ये कोणतीही छेडछाड करण्यात आलेली नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

करण जोहरच्या वकिलांसह 4 जणांची चौकशी

एनसीबीने काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्माते करण जोहर याला चौकशीसाठी समन्स पाठविले होते. त्यानुसार एनसीबीने करण जोहर यांच्या वकिलासह एपूण 4 जणांची चौकशी मुंबई येथील कार्यालयात पूर्ण केली असून या चौकशीत करण जोहर याच्या घरी 2019 ला झालेल्या पार्टीचीदेखील चौकशी करण्यात आल्याचे कळते.