bollywood-actor-nawazuddin-siddiqui-says-he-has-done

(Movie) 'ठाकरे', 'कहानी', 'किक', 'मंटो' अशा बहुरंगी चित्रपटांमध्ये कथानकाला तितकंच महत्त्व देत आणि आपल्या अभिनय कौशल्याला अधोरेखित करत प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता म्हणजे नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) आपल्या वाट्याला आलेल्या प्रत्येक भूमिकेला त्यानं सर्वतोपरी न्याय देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आहे. 

अगदी बऱ्याच वर्षांपूर्वी 'सरफरोश' या चित्रपटामध्ये मिळालेली एखादी लहानशी भूमिका असो किंवा मग तलाश या चित्रपटातील 'तैमूर' असो. नवाजनं कायमच मोठ्या सातत्यानं त्याचं वेगळेपण सिद्ध केलं. अगदी हलक्याफुलक्या चित्रपटांमध्येही तो झळकला. याबाबतच सांगताना तो म्हणाला. असं नाही नाही की मी हलकेफुलके चित्रपट करणार नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही तिथं प्रत्येक प्रकारची नाटकं करायचो, असं सांगत सर्व प्रकारच्या भूमिका करणं हे अभिनेत्याचं कामच आहे असं नवाज म्हणाला. 

अमूक एक टेलिव्हिजन अभिनेता आणि तमुक एक चित्रपट अभिनेता असं वर्गीकरण न रुचणारा नवाज म्हणतो, अभिनय हा अभिनयच असतो. वृक्षावर चढून करा किंवा रस्त्याच्या एखाद्या नाक्यावर नाटक करा, चांगला अभिनेता हा कुठेही चांगलाच किंबहुना उत्तमच असतो. आपल्याला चित्रपटांच्या माध्यमातून ही कला आणखी खुलवता येते.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

पैशांसाठीच केले (Movie) चित्रपट... 

कारकिर्दीत यशाच्या शिखरावर असणाऱ्या नवाजनं आपण काही चित्रपट हे निव्वळ पैशांसाठीच केल्याची कबुलीही दिली. 'हो, मी पैशांसाठी चित्रपट केले आणि यापुढंही करेन. मी असेही काही चित्रपट केले आहेत जेथे मला चांगले पैसे मिळाले. पण, मी असेही काही चांगले चित्रपट करेन जेथे मला जास्त पैसे मिळणार नाहीत किंवा मी ते चित्रपट मोफतही करेन. मी सहसा चित्रपटांसाठी पैसे आकारत नाही. पण, (मंटो) या चित्रपटासाठी मी असं केलं होतं. मी काहीच पैसे घेतले नव्हते', असं तो म्हणाला.

'मंटो'साठी पैसे घेतले नसले तरीही त्या तीन-चार महिन्यांच्या प्रक्रियेत चित्रपटापूर्वी किंवा नंतर मात्र मला पैशांसाठी एखादा चित्रपट करावा लागेल हेसुद्धा खरं होतं. आर्थिक समतोल राखण्यासाठी ही बाब महत्त्वाची असल्याचा मुद्दा त्यानं इथं अधोरेखित केला. एक अभिनेता म्हणून संपन्न असणाऱ्या नवाजचा हा अंदाज नव्या जोमाच्या कलाकारांसाठी खूप काही शिकवणारा असाच आहे.