
___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला साजेशी सुरुवात करता आली नाही. शिखर धवन ( १) आणि विराट कोहली ( ९) स्वस्तात माघारी परतले. संजू सॅमसन १५ चेंडूंत २३ धावा करून माघारी परतला. वन डे मालिकेत बाकावरच बसलेल्या मनीष पांडेला आज संधी मिळाली, परंतु तो अवघे दोन धावा करून माघारी परतला. लोकेश ४० चेंडूंत ५ चौकार व १ षटकार मारून ५१ धावांवर माघारी परतला. हार्दिकनं काही अफलातून फटके मारले, परंतु त्याला १६ धावांवर माघारी जावं लागलं. मोइजेस हेन्रीक्सनं ४-०-२२-३ अशी कामगिरी केली. जडेजानं २३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या, टीम इंडियानं ७ बाद १६१ धावा केल्या.
सामन्याच्या अखेरच्या षटकात जडेजाच्या हेल्मेटला चेंडू आदळला आणि आयसीसी (ICC) च्या नियमानुसार खेळाडू मैदानावर जखमी झाल्यास त्याच्या जागी बदली खेळाडू मैदानावर उतरू शकतो. तो गोलंदाजी किंवा फलंदाजीही करू शकतो. या नियमानुसार चहल आता गोलंदाजी करणार आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.