parthiv-patel-announces-retirement

टीम इंडियाचा विकेट किपर पार्थिव पटेल (Parthiv Patel) याने सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉर्ममधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भात ट्विटर वरून माहिती दिली आहे. वयाच्या 35 व्या वर्षी त्याने निवृत्ती जाहीर केली आहे.

---------------------------------------------

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

-------------------------------------------------

8 ऑगस्ट 2002 मध्ये कसोटी सामन्यापासून त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केले होते. इंग्लंड विरुद्ध सामन्यापासून त्याच्या करिअरला सुरुवात झाली होती. तर 8 ऑगस्ट 2008 मध्ये श्रीलंकेत शेवटचा कसोटी सामना खेळला. तर 4 जानेवारी 2003 मध्ये त्याने न्यूझीलंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला आणि 27 जुलै 2004 मध्ये श्रीलंके विरुद्ध अंतिम एकदिवसीय सामना खेळला. यानंतर आयपीएलमध्ये पार्थिव पटेलला चांगली संधी मिळाली. मात्र यादरम्यान तो फारशी प्रभावी कामगिरी करू शकलेला नाही.

एकूण 25 कसोटी सामन्यात 934 धावा केल्या आहेत ज्यामध्ये 6 वेळा अर्धशतक ठोकले आहे. एकदिवसीय कारकिर्दीत 38 सामने खेळले आहेत ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच 2 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने तो खेळला आहे. त्यासोबतच आयपीएलच्या 139 सामन्यात त्याने 2848 धावा केल्या आहेत ज्यामध्ये 13 अर्धशतकांचा समावेश आहे.