virat-kohli-record-of-t20-series-win

Cricket News : जागतिक स्तरावर धावांचा पाऊस पाडत विविध विक्रम नावावर करणारा हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. हार्दीक पांडय़ाच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी क्रिकेट संघाने रविवारी ऑस्ट्रेलियाला हरवले आणि टी-20 मालिका आपल्या नावावर केली.

-------------------------------------------------------

Must Read 
------------------------------------------------------------

या सणसणीत विजयासह विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला. ऑस्ट्रेलियासह, दक्षिण आप्रैका, इंग्लंड व न्यूझीलंड या देशांमध्ये टी-20 मालिका जिंकणारा तो हिंदुस्थानातील पहिलाच कर्णधार ठरलाय. याआधी हिंदुस्थानातील कोणत्याही कर्णधाराही ही करामत करता आलेली नाही.

धोनी कमी पडला

महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) च्या नेतृत्वात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. पण महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदात हिंदुस्थानला इंग्लंड व न्यूझीलंड या देशांमध्ये मालिका जिंकण्यात अपयश आले होते.

ऑस्ट्रेलियात कसोटी, वन डे, टी-20 मालिका जिंकणाराही पहिलाच

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी, वन डे आणि टी-20 मालिका जिंकणारा तो पहिलाच आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डयुप्लेसिसनेही ही करामत करून दाखवलीय. पण 2018 साली ऑस्ट्रेलियात झालेली टी-20 मालिका ही अवघ्या एक सामन्याची होती. यामध्ये फाफ डयुप्लेसिसच्या दक्षिण आफ्रिकन संघाने बाजी मारली होती. विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मालिका जिंकल्या आहेत, त्या मालिका एकपेक्षा जास्त सामन्यांच्या आहेत हे विशेष.