eleventh-standard-special-round-schedule

(11th Time Table) मुंबई महानगर प्रदेशातील अकरावी ऑनलाइन (Online) प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या पार पडल्या आहेत. यानंतरही 75 हजारहून अधिक विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी यासाठी रविवारपासून (ता.20) विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. 

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादीसाठी 1 लाख 16 हजार 80 विद्यार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी 45,402 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले होते. अर्ज केल्यानंतरही  70 हजार 678 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. तिसऱ्या फेरीनंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आता विशेष फेरीचे आयोजन केले जाणार आहे. या फेरीआधी कोट्यातील रिक्त जागा ऑनलाइन प्रक्रियेत वर्ग करण्यात आल्या आहेत. (11th Time Table) यामुळे या फेरीला जास्त जागा उपलब्ध होतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ही प्रवेश फेरी 27 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. यानंतरही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एका फेरीचे आयोजन केले जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 

Must Read

1) सुदर्शन पाटील यांचा दोनशे कार्यकर्त्यांसह सतेज पाटील गटात प्रवेश

2) कोल्हापूर: एकाच दिवशी नऊ सावकारांवर छापे

3) मोठी बातमी! क्रिकेट घोटाळाप्रकरणी 12 कोटींची संपत्ती जप्त

4) 'Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल

5) Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग

असे आहे वेळापत्रक

20 डिसेंबर - रिक्त जागांची स्थिती जाहीर करणे
20 ते 22 डिसेंबर - महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरणे. 
23 डिसेंबर - तांत्रिक प्रक्रियेचा दिवस
24 डिसेंबर - सकाळी 11 वाजता गुणवत्ता यादी जाहीर. 
24 ते 26 डिसेंबर - विद्यार्थ्यांनी प्रेवश निश्चित करणे. 
266 डिसेंबर - महाविद्यालयांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी जाहीर करणे
27 डिसेंबर - प्रवेश फेरीनंतर रिक्त जागांची यादी.