pandharpur-sharad-pawar-stopped-the-vehicle

(Releshionship) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर प्रेम करणारे राज्यात लाखो चाहते आहेत. अशाच एका आपल्या चाहत्याला रस्त्यात गाडी उभी करून शरद पवार यांनी लग्नानिमित्त भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवारांनी दाखवलेल्या या प्रेमाने नव वधूवर भारावून गेले.

पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शेतकरी तरूण सुरज शिंदे यांचा काजल हिच्या बरोबर कालच विवाह झाला होता. दरम्यान आज शरद पवार पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे येणार असल्याची माहिती मिळाताच सुरज आणि काजोल हे दोन्ही नव विवाहित्य जोडपे पवारांच्या भेटीसाठी सरकोली गावी आले होते.

दरम्यान, पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना सरकोली येथे जाता आले नाही म्हणून ते आंबे गावाजवळील रस्त्यावर पवारांची वाट पाहत थांबले होते. (Releshionship) पवारांच्या गाड्यांचा ताफा येतान शिंदे यांनी हात दाखवला. पवारांनीही आपली गाडी थांबवून आधिक चौकशी केली असता सुरज शिंदे यांनी आपण आपले आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचं सांगितलं.

त्यानंतर शरद पवार यांनी नव वधूवरांना आशीर्वाद देवून शुभेच्छा दिल्या.पवार आणि नव वधूंच्या या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पवारांचे मनापासून स्वागत करणारे चाहते आणि त्यांनी दिलेला प्रतिसाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.