59-people-other-country-kolhapur-test-corona

(Kolhapur Corona) गेल्या महिन्याभरापासून ब्रिटनमधील नव्या कोरोना संसर्गामुळे (Kolhapur Corona) चिंतेचे ढग पुन्हा दाटू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रणेने तपासणी केली. यात गेल्या महिन्याभरात एकूण ६२ व्यक्‍ती परदेशातून कोल्हापुरात आल्या आहेत. यांपैकी ५९ जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 

अन्य तिघांचे २८ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांचा क्वारंटाईनचा कालावधीही पूर्ण झाला आहे. त्यामुळे चाचणी केलेली नाही. जिल्ह्यात ब्रिटनमधून किंवा परदेशातून आलेला एकही नवा कोरोनाबाधित सापडलेला नाही, अशी माहिती आरोग्य सेवेतील वरिष्ठ डॉक्‍टरांकडून देण्यात आली.   

-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------

आठ महिन्यांत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन होता तसेच कोरोनाच्या संसर्गात अनेकांचे बळी गेले. कोरोनाचे नवे रुग्ण कमी संख्येने का असेना, पण सापडत आहेत. यातच ब्रिटनमध्ये नव्या स्वरूपाचा कोरोना संसर्ग सुरू झाला आहे. (Kolhapur Corona) त्यामुळे परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यास आरोग्य यंत्रणेने सुरवात केली आहे. परदेशातून आलेल्या ६२ व्यक्ती आढळल्या. पैकी ५९ व्यक्तींची कोरोना तपासणी झाली असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. त्यामुळे परदेशातून आलेला व सध्या बाधित असलेला एकही रुग्ण नसल्याची माहिती वरिष्ठ डॉक्‍टरांनी दिली. 

ती केवळ चर्चाच!

ब्रिटनमधून आलेल्या दहा व्यक्ती बाधित असल्याची चर्चा होती. आरोग्य यंत्रणेने याचा तपास केला. गेल्या आठ दिवसांत ब्रिटनवरून कोणीही आलेले नाही. कोणाची तपासणी शासकीय प्रयोगशाळेकडे झालेली नाही, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.