shocking-theft-of-16-lakh-goat-from-sangl

(Sangli Dristics) जिल्ह्यातील आटपाडीतल्या सोमनाथ जाधव (Somnath Jadhav)  यांच्या 16 लाखांच्या बोकडाची चोरी (Theft of 16 lakh goat ) झाली आहे . शनिवारी पहाटे अजिचच्या सुमारास एका आलिशान गाडीतून हा बोकड (Goat) चोरुन नेण्यात आलं आहे. सांगलीतल्या प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पोर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या जनावरांच्या बाजारात चर्चेत असलेल्या दीड कोटींच्या बोकडाची चर्चा होती. याच बोकडाचा हा वंशज होता  या बोकडालाही १६ लाखांची किंमत मिळाली होती.. 

सांगली जिल्ह्यातील आटपाडीतील प्रसिद्ध उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित जनावरांच्या बाजारात दीड कोटी रुपये दर असलेला मोदी बकरा आणि त्याचाच वंश असलेल्या १६ लाखांचा बकरा चर्चेचा विषय ठरला होता. याच सोळा लाख रुपये किंमत असलेल्या बकऱ्याची शनिवारी पहाटे चोरी झाली असून आलिशान चारचाकी गाडीतून हा बकरा लंपास करण्यात आल्याने खळबळ माजली आहे.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


 सांगोला तालुक्यातील चांडोलवाडी येथील बाबुराव मेटकरी यांचा मोदी नावाचा प्रसिद्ध बकरा दीड कोटी रुपयांचा आहे . त्याला आटपाडी च्या बाजारात ७० लाख रुपये इतका प्रचंड दराने मागणी झाली. (Sangli Dristics) पण तो त्यांनी विकला नाही. याच दिड कोटी किमतीचे बीज असलेले आटपाडीतील सोमनाथ जाधव यांच्या अवघ्या सहा महिन्याच्या बकऱ्याला तब्बल 16 लाख इतका दर आला होता. उच्चांकी दरामुळे मोदी बकरा आणि त्याचे पिल्लू हे महाराष्ट्र , कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात प्रसिद्ध झाले . यातील सोमनाथ जाधव यांचा 16 लाख रुपयांचा बकरा शनिवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास आलिशान चार चाकी वाहनातून चोरून देण्यात आला. या घटनेने आटपाडी शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.