baba-ka-dhaba-kanta-prasad-accused-youtuber

(Threat) सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून नाव आणि प्रसिद्धी मिळालेली अनेक उदाहरणं तुम्ही ऐकली असतील. दिल्लीमध्ये (Delhi) ‘बाबा का ढाबा’ चालवणारे कांता प्रसाद (Kanta Prasad) हे त्याचं अलिकडच्या काळतलं एक मोठं उदाहरण आहे.  कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमध्ये ढाबा बंद होता, त्यामुळे या दाम्पत्याला दोन वेळचं अन्नही मिळत नव्हतं. गौरव वासन (Gaurav Wasan) या  युट्यूबरने (Youtuber) त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन सोशल मीडियावर शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अनेक जण यांच्या मदतीसाठी पुढे आले. ‘बाबा का ढाबा’ ची लोकप्रियता वाढली. त्यामुळे कांता प्रसादही प्रसिद्धीच्या झोतात आले. आता याच कांता प्रसाद यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा कांता प्रसाद यांनी केला आहे.

कुणी दिली धमकी?

‘बाबा का ढाबा’ चालवणाऱ्या कांता प्रसाद यांनी त्यांना सातत्यानं जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा केला आहे. ‘आपला ढाबा जाळण्याची धमकी देखील ही मंडळी देत आहेत’, असे त्यांनी सांगितलं. ‘आपलं कुणाशीही जुनं वैर नाही, मात्र काही अज्ञात मंडळी ढाब्यावर येऊन किंवा फोन करुन धमकी (Threatदेत आहेत,’ असं प्रसाद यांनी म्हंटलं आहे.

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

पोलिसांकडे  तक्रार

सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे आता घराच्या बाहेर पडण्याची भीती वाटत असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं. त्याचबरोबर या प्रकरणात त्यांनी स्थानिक पोलिसांमध्ये तक्रारही केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी अजून कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल केलेली नाही, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. पोलीस सध्या  या प्रकरणाचा प्राथमिक पातळीवर तपास करत आहेत.

युट्यूबर गौरव वासननं दिली धमकी?

कांता प्रसाद यांना या प्रकरणात मदत करण्यासाठी अ‍ॅड. प्रेम जोशी पुढे आले आहेत. ‘बाबा का ढाबा’ ला ज्या युट्यूबरमुळे  ‘अच्छे दिन’ आले तो युट्यूबर गौरव वासनच ही धमकी देत असल्याचा आरोप जोशी यांनी केला आहे. जोशी यांच्या या आरोपाला अद्याप कोणतीही पुरावा मिळालेला नाही.