ncp-women-state-president-rupali-chakankar

(Polirics News) राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने अर्वाच्य भाषा वापरात धायरी येथील कार्यालय पेटवून देण्याची धमकी फोनद्वारे दिली आहे. जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) असे सदर व्यक्तीचे नाव असून त्याच्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुपारच्या सुमारास रुपाली चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने फोन करून "रूपाली चाकणकर कुठे आहे? मला तिचा मोबाईल नंबर हवा आहे. ती काय करते पाहून घेतो. तिचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो," असे म्हणत अर्वाच्च भाषा वापरली.

Must Read

1) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा मोठा निर्णय...

2) खडसेंमागे ईडी लावली, आता खडसे सीडी कधी लावणार?

3) सिनेसृष्टीला मोठा धक्का! शूटिंगला गेला होता अभिनेता...

4) बापरे! इथं निरोगी लोक जाणूनबुजून कोरोना पॉझिटिव्ह होणार...

5) लग्नाच्या 15 दिवसानंतरच नववधू निघाली 5 महिन्याची गरोदर

यावेळी रूपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेलेल्या होत्या. (Polirics News) घडलेला प्रकार रूपाली चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी सदर प्रकार चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिला. चाकणकर यांच्याशी विचारविनिमय केल्यानंतर स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

"कार्यालयात धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. पोलिस योग्य तपास करुन संबंधित व्यक्तीवर कारवाई करतील."