the-end-of-a-love-affair-the-death-of-a-woman-

(Married) देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात गुन्हेगारी (Crimeघटनांचे सत्र सुरूच आहे. शहरातील सदर पोलीस स्टेशन हद्दीत एका विवाहित महिलेनं प्रेम प्रकरण लपवण्यासाठी पेटवून घेण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शहरातील महेंद्रनगर भागात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. शबाना अब्दुल जावेद (वय 40 ) असं या महिलेचं नाव आहे. शबानाही विवाहित होती. तीचे एका मुलाशी प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंध लपवण्यातून ही घटना घडल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेने स्वतःचे प्रेम प्रकरण लपवण्यासाठी पेट्रोल टाकून पेटवण्यात आल्याचे मृत्यूपूर्वी महिलेनं जबाबात म्हटलं आहे. पण प्रत्यक्षात पोलीस तपासात जे पुढे आल ते चक्रावून टाकणारे होते.

शबानाचे अर्ध्या वयाच्या युवकाशी प्रेम संबंध होते. तिने या तरुणाकडे लग्नासाठी तगादा लावला होता. पण, या तरुणाने तिला लग्नास नकार दिला होता. शुक्रवारी दोघांमध्ये याच कारणावरून वाद झाला होता.  त्यानंतर शबानाने पेटवून घेतल्याचे बोलले जात आहे. नागरिकांनी तातडीने या शबानाला रुग्णालयात दाखल केले होते. पण, गंभीर भाजल्यामुळे तिचा मृत्यू झाला.  (Married) पण या घटनेत महिलेनं स्वत: पेटवून घेतले की जाळले, हे मात्र अजून तपासातून अद्याप पुढे आले नाही. पोलीस तपास करत आहे.दरम्यान, पोलिसांनी शबानाच्या प्रियकराला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सदर पोलीस करत आहे.

लग्न सोहळ्यात घुसून तरुणाची हत्या

दरम्यान, किरकोळ कारणावरून लग्न समारंभ सुरू असताना लॉनमध्ये घुसून एका तरुणाची हत्या करण्याची खळबळजनक घटना शहरातील हुडकेश्वर पिपळा फाट्याजवळ डांगे लॉनमध्ये शुक्रवारी रात्री  10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अखलेश मिश्रा ( वय 31) असं मृत तरुणाचं नाव आहे. तर 21 वर्षीय ओम मिश्रा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मृत अखलेश मिश्रा आणि ओम मिश्रा हे दोघेही लग्न सोहळ्यात कॅटरर्समध्ये आचारीचे काम करत होते. स्वयंपाक सुरू असताना अचानक धारदार शस्त्र घेऊन हल्लेखोरांनी लग्नात घुसून थेट स्वयंपाक खोली गाठली. त्यानंतर अखलेश याच्यावर चाकूने सपासप वार केले. अखलेशला वाचवण्यासाठी पुढे धावलेल्या ओम मिश्रावरही हल्लेखोरांनी वार केला. अखलेश जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यानंतर हल्लेखोर लग्न सोहळ्यातून पसार झाले. भर लग्नसमारंभात खुनाचा प्रकार घडल्यामुळे एकच खळबळ उडाली.