Ruturaj Patil

(Kolhapur Politics News) कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील गडमुडशिंगी गावातील तसेच छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या माजी संचालिका गीता सर्जेराव पाटील यांचा मुलगा सुदर्शन सर्जेराव पाटील यांच्यासह दोनशेहून अधिक कार्यकर्त्यानी आज आमदार ऋतुराज पाटील (Rituraj Patilयांच्या उपस्थिती पालकमंत्री सतेज पाटील गटात प्रवेश केला आहे.

सुदर्शन पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील गडमुडशिंगीत गेले अनेक वर्षे महाडिक गटाचे नेतृत्व केले आहे. पाटील यांच्या पक्षप्रवेशावेळी बोलातना आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, दक्षिण मतदारसंघासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही सातत्याने काम करीत आहोत. आजपर्यंत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patilतसेच पाटील कुटुंबीयावर कार्यकर्त्यानी ठाम विश्वास ठेवला आहे. येथून पुढेही कार्यकर्त्यांसाठी कुठेही कमी पडणार नाही. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गावातील सर्वांनी एकत्र येवून सतेज पाटील गटाचा झेंडा फडकवण्यासाठी सज्ज रहावे.

यावेळी सुदर्शन पाटील म्हणाले, गडमुडशिंगी गावातील विकासासाठी (Kolhapur Politics News) आमच्या विश्वासातील सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन येथून पुढे पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करू.

यावेळी माजी सभापती प्रदीप झांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासो माळी, रावसाहेब पाटील, विनोद सोनूले, तानाजी धनवडे,बागल कांबळे,सचिन पाटील,सुकुमार देशमुख, उत्तम शिंदे,भानुदास कांबळे,पांडुरंग पाटील,याच्यासह कार्यकर्तेमोठ्या संख्येने उपस्थित होते.