_______________________
Must Read
1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर
2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले
3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल
5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार या हिंदी चित्रपटात
6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
______________________________
पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे यांनी प्रस्ताव आणला आहे. अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहिम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अनधिकृत नळ कनेक्शन घेतल्याचे निदर्शनास आल्यास तीन वर्षाची पाणीपट्टी व 5 हजार रुपये दंड भरण्याची तरतूद आहे. तत्पूर्वी, अभय योजना राबवण्याचा प्रस्ताव सभागृहासमोर मंजुरीसाठी आहे.
शहरात सुमारे 57 हजार मिळकती आहेत. पण तुलनेने नळ कनेक्शनची संख्या खूपच कमी आहे. सध्या 43 हजार नळ कनेक्शन असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात परस्पर अनेकांनी नळ कनेक्शन घेतल्याची चर्चा होत असते. यापूर्वीही असे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वर्षापासून असे अनधिकृत नळ कनेक्शन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण राजकीय कारणास्तव त्याचा शोध घेण्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही.
मुळात पाणी पुरवठा विभागाकडून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. पाणीपट्टी वाढवण्यास विरोध होतो. पाणी पुरवठ्यावर होणारा खर्च आणि उत्पन्न यामध्ये तफावत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अनधिकृत कनेक्शन अधिकृत करण्याची नागरिकांना संधी देण्याचा प्रस्ताव अभय योजनेच्या माध्यमातून सभागृहासमोर चर्चेला ठेवण्यात येणार आहे.