real clear politicsreal clear politics- ठाणे जिल्हाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचा खळबळजनक असा प्रकार (blackmagic) समोर आला आहे. या प्रकरणी जादूटोणा करणाऱ्या दोघांना बोईसर गुन्हे शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.

राज्यात वाढते अघोरी जादूटोणा नरबळींचे प्रकार लक्षात घेता राज्य सरकारने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा, जादूटोणा (blackmagic) याला प्रतिबंध घालण्यासाठी व समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला. मात्र, तरीही विक्रमगड तालुक्यातील जव्हार पोलीस स्टेशन परिसरातील तलावली येथील एका घरात तांदळामध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळवण्याचे हेतूने शिंदे यांच्या जीवास धोका निर्माण व्हावा आणि त्यांच्या शरीरास जखमा होऊन दुखापत करण्याकरता अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर केला गेला. (real clear politics)

----------------------------------------------------------

Must Read

1) कोल्हापूर : पंचगंगा नदीत अज्ञाताचा मृतदेह; खून की आत्महत्या तपास सुरू

2) `पवारसाहेब, तुम्ही या कामासाठी मला फोन करत जाऊ नका....`

3) TMC मध्ये बंड; ‘या’ आमदाराचा राजीनामा

4) ऊर्मिला मातोंडकर यांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

-------------------------------------------------------

तसेच मंत्री शिंदे यांच्या फोटोस अगरबत्ती लावत हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, पांढऱ्या कोंबड्याच्या वापर करुन अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. कृष्णा बाळू कुरकुटे व संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक व महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस जादूटोणा करणाऱ्या सूत्रधाराच्या शोध घेत आहेत.