eknath khadasepolitics news of maharashtra-
सिक्वेन्स आणि टाइमिंग पाहिलं तर एकनाथ खडसे हे भाजपच्या विरोधी असल्यानं भाजप त्यांच्या मागे ED लावत आहेत. जे जे भाजपविरोधी आहेत त्यांच्या मागेच भाजपा ED लावत आहे. भाजप खूनशी प्रवृत्तीने वागत आहे. खुनशी प्रवृत्तीने मागे लागणे हे यापूर्वी भारतात होत नव्हतं ते आता होताना दिसते.

परंतु खडसे पूर्ण निर्दोष आहेत त्यांच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही आणि आम्हाला ED चौकशीचे कोणतेही भय वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


यावेळी जयंत पाटील म्हणाले, 'फडणवीस बरेच वेळा इस्लामपूर मध्ये येऊन गेलेत. फडणवीस आमचे मित्र आहेत. फडणवीस येतात ते त्यांचा पक्ष स्थिरस्थावर करण्यासाठी. शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात भाजप वागत आहे. भाजपकडून शेतकऱ्यांच्या वर अन्याय सुरू आहे. चुकीच्या कायद्याच समर्थन करण्यासाठी फडणवीस तिथे येत असतील तर मी काय बोलायचं. असही पाटील म्हणाले आहे. (politics news of maharashtra)

दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण संदर्भात सुरू असणाऱ्या सुनावणीत सरकारनं संपूर्ण लक्ष दिल आहे.सरकारच्या बाजूने सर्व वकील सुप्रीम कोर्टाला मराठा आरक्षनाच महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मराठा आरक्षण टिकेल.