#bigboss14#bigboss14- 'बिग बॉस 14'च्या फायनल वीकमध्ये टॉप -4 स्पर्धकांनी आपली जागा बनवली आहे. वीकेंडला या फायनल 4 स्पर्धकांच्या नावाची घोषणा केली जाणार. एजाज खान आणि अभिनव शुक्ला यांनी अंतिम 4 मध्ये आपले स्थान आधिच निश्चित केले होते. आता उर्वरित दोन स्पर्धकांचे नाव समोर आली आहेत. 

एजाज खान आणि अभिनव शुक्लासोबत रुबीना (#rubinadilaik)आणि जॅस्मीन फायनल 4 मध्ये पोहोचल्या आहेत. प्रेक्षकांनी या दोन्ही स्पर्धकांना जास्त वॉटिंग केले आहे. त्याचवेळी प्रेक्षकांच्या कमी वॉट्समुळे राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी शोमधून बाहेर पडले आहेत. मात्र ही बातमी कितपत खरी आहे, हे आपल्याला शो ऑनएअर झाल्यावरच कळले. 

Must Read

बिग बॉस (#bigboss14) खबरीच्या रिपोर्टनुसार जॅस्मीन भसीन आणि राहुल वैद्य यांच्यात वॉट्समध्ये जास्त फरक नव्हता. मात्र राहुलवर मात करत जॅस्मीनने फायनलमध्ये आपली जागा बनवली. या शोमध्ये राहुल वैद्यने आतापर्यंत खूप चांगले प्रदर्शन केले आहे. तो कॉमेडी, ड्रामा, एंटरटेनमेंट आणि सर्व काही करताना दिसला. टास्कमध्येही त्यांने चांगलं परफॉर्म केले. 

'बिग बॉस 14'च्या सुरूवातीपासूनच निक्की तांबोली एक मजबूत स्पर्धक राहिली. रणनीतीपासून ते टास्कपर्यंत प्रत्येक गोष्टीत ती 100 टक्के देताना दिसली. नुकत्याच झालेल्या शार्क अ‍टॅक टास्कमध्ये निक्कीने शेवटपर्यंत कडवी झुंज दिली. अगदी तिचा प्रतिस्पर्धी अभिनव शुक्लानेही निक्कीचे कौतुक केले.

या गेममध्ये अभिनव शुक्लाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. चाहत्यांनी त्याचे खूप समर्थन मिळाले. बिग बॉस 14 फायनल -4 ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.