bharat-bandh-support-for-farmers

अखिल भारतीय वकील संघाने(All India Bar Association)  भारत बंदला आपला पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देताना तिस हजारी जिल्हा न्यायालयाच्या येथे निदर्शने केली. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत, असे वकील संघाने म्हटले आहे.

Must Read

1) 'या' जिल्ह्यातील पर्यटनस्थळे उद्यापासून खुली करणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

2) मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्वाचा, घटनापीठसमोर सुनावणी

3) शिक्षण सेवकांची थांबवलेली भरती पुन्हा सुरू होणार !

4) लालबाग सिलिंडर स्फोटप्रकरणी पिता-पुत्रावर मनुष्यवधाचा गुन्हा

5) चार कॅमेऱ्यांचा Vivo Y51 भारतात लॉन्च; अद्ययावत फिचर्ससह बजेट स्मार्टफोन

काँग्रेसची मोटार सायकल रॅली 


जालना शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेले कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये जालन्यात काँग्रेसने पाठिंबा देत सहभाग नोंदवला.भारत बंद निमित्त जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील मामा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. केंद्र सरकारने शेतकऱ्यांविरोधात केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. 

आता भाजपची जनजागृती मोहीम 


मुंबई  शेतकरी कायद्याला होणार विरोध आणि भारत बंद आंदोलन या मुद्द्यावर प्रतिहल्ला चढवण्याची भाजपने रणनीती आखली आहे. शेतकरी कायद्याबद्दल व्यापक जनजागृती करण्याची रणनीती भाजप आखत आहे. आमदार - खासदार - पदाधिकारी  - कार्यकर्ते यांच्यामार्फत लोकांमध्ये जात शेतकरी कायदा कसा उपयुक्त आहे, योग्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न यापुढच्या काळात केला जाणार आहे. या प्रचारासाठी कुठलाही मुहूर्त न निवडता स्थानिक पातळीवर खास करून ग्रामीण भागात जनजागृती मोहीम अंमलात आणण्याची रणनीती भाजप तयार करत आहे.

शिवसेनेच्या बाईक रॅलीला  मज्जाव


लातूर  केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या लातूर बंद मध्ये राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलिसात बाचाबाचीचेही प्रसंग घडले. लातूर बंदचे आवाहन करण्यासाठी शिवसेनेने मोटारसायकल रॅली काढली. ही रॅली गंजगोलाईकडे जात असताना पोलिसांनी हनुमान चौकात अडवली. यावेळी पोलिसांनी गंजगोलाईत रॅली घेऊन जाण्यास मज्जाव केला.

समाजवादी पक्षाची बैलगाडी रॅली  .


मुंबई  गोवंडीतील समाजवादी पक्षाचे आमदार  (Abu Asim Azmi) अबू असीम आझमी यांनी बैलगाडीत बसून एक रॅली काढली आणि शिवाजीनगर चौकात येऊन रास्ता रोको केला. मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देत शेतकरी विरोधी कायदा मागे घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी अबू आझमी यांना बैल गाडीतून खाली उतरवत त्यांना ताब्यात घेण्यात आले.

जय जवान जय किसान - काँग्रेस


मुंबई भारत बंदच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने दहिसर मालाड कांदिवली परिसरात आंदोलन करण्यात आला केंद्र सरकारच्यावतीने शेतकऱ्याच्या विरोधात जे बिल पास करण्यात आले ते परत घेण्यात यावे व जय जवान जय किसान अश्याप्रकारे घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्ते यांनी भारत बंद मध्ये सहभाग घेण्यात आला.

नागपुरात मोदी सरकाविरोधात घोषणाबाजी 


नागपूर  ऑटोमोटिव्ह चौकात गुरुद्वारा प्रबंधन समिती, ट्रान्सपोर्ट असोसिएशन आंदोलन सुरु करण्यात आले आहे. यावेळी येथे वाहतूक कोंडी झाली होती. मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कृषी विधेयक मागे घेण्याची आंदोलकांची मागणी केली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता.

सायन पनवेल महामार्ग रोखला


नवी मुंबई  आंदोलनकर्त्यांनी पुन्हा सायन पनवेल महामार्ग रोखला. अत्तापर्यत तीन वेळा महामार्ग रोखला गेला आहे. महामार्ग रोखून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी तसेच मीडिया विरोधात देखील घोषणा करण्यात आली.

कृषी कायद्याच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलं इंडिया नवी मुंबई ट्रान्सपोर्ट आणि गुरुद्वारा तर्फे कार आणि बाईक रॅली च आयोजन करण्यात आले. मुंबईच्या मरीन ड्रॉईव्ह येथे मानवी साखळी तयार करून शांततेत विरोध प्रदर्शन करणार  होते. परंतु त्यांना मुंबई पोलिसांनी रोखून धरले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी  काही काळा पुरता सायन पनवेल महामार्ग रोखून धरला  होता  यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतुक कोंडी झाली होती.  

मनमाड येथे काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी 


मनमाड केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्यात यावा या मागणीसह  दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनमाडला किसान सभा घेण्यात आली. काँग्रेस उतरली रस्त्यावर उतरली होती. मनमाड बाजार समितीपासून मोर्चा काढण्यात आला होता. तर आंदोलकांनी पुणे-इंदौर महामार्गावर रास्ता रोकण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिवसेनेकडून दुकाने बंद


कल्याण  केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात कल्याणमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर  उतरुन  दुकाने आणि रिक्षा बंद केल्या. शेतकऱ्यांनी  पुकारलेल्या भारत  बंदला शिवसेनेने पाठिंबा दर्शविला आहे.  मात्र, सकाळपासून काही प्रमाणात दुकाने आणी रिक्षा सुरु होत्या त्यामुळे दुपारी १२ वाजल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी दुकाने  आणी रिक्षा बंद करण्यासाठी रस्त्यावर उतरले.

सोलापुरात माकप कार्यकर्त्यांची धरपकड


सोलापूर  शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज माकपच्यावतीने चक्का जाम करण्यात आला होता. मात्र पोलिसांनी हा चक्का जाम मोडीत काढत कार्यकर्त्यांची धरपकड केली. माजी आमदार नरसय्या आडम यांच्या नेतृत्वात महिलांचा भव्य मोर्चा निघाला होता, या मोर्चाने, सोलापूर-विजयपूर रोडवर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजसमोर चक्का जाम आंदोलन केले. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता याच फौजफाट्याने  चक्का जाम मोडीत काढला. माजी आमदार नरसय्या आडम यांना देखील पोलीसांच्या ताब्यात घेतले. 

उत्तर प्रदेश । भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी गाझीपूर-गाझियाबाद (दिल्ली-उत्तर प्रदेश) सीमेवर निदर्शने केली. दरम्यान, जर सरकार कायदा बनवू शकते तर ते कायदा देखील रद्द करू शकतात, असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.