crime news bank fraud


crime news- केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) (Central Bureau of Investigation) हैदराबादच्या (Hyderabad) एका कंपनीवर (company) मोठा कर्ज घोटाळा (loan fraud) केल्याचा आरोप केला आहे. ट्रान्सस्ट्रॉय इंडिया लिमिटेड (Transstroy India Limited) या कंपनीविरोधात त्यांनी अनेक बँकांना (banks) ८,००० कोटी रुपयांना फसवल्याचा आरोप ठेवला आहे अशी माहिती अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

नीरव मोदी घोटाळ्यापेक्षाही मोठी आहे रक्कम

या घोटाळ्याची (loan fraud) एकूण रक्कम ही कुप्रसिद्ध नीरव मोदी घोटाळ्यापेक्षाही जास्त आहे. नीरव मोदी सध्या भारताबाहेर असून त्याला देशात आणण्याचे प्रयत्न चालू आहेत आणि सध्या तो इंग्लंडमधील एका कारागृहात आहे. तो भारतातील विविध बँकांचे ७,७०० कोटी रुपयांचे देणे बाकी आहे.

------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO


--------------------------------------------------------

हैदराबादची बांधकाम कंपनी आहे ट्रान्सस्ट्रॉय लिमिटेड

मागीलवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादने महामार्ग, पूल, पाणीपुरवठा प्रकल्प, मेट्रोशी संबंधित बांधकामे या क्षेत्रातील ट्रान्सस्ट्रॉय या कंपनीविरोधात लिक्विडेशन प्रक्रियेत आदेश काढला होता. सीबीआयच्या बंगळुरू शाखेत दाखल केलेल्या एफआयआरमध्ये सीबीआयने रायापती सांबशिव राव आणि अक्किनेणी सतीश यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीआयच्या पथकांनी काल बंगळुरू आणि गुंटूर परिसरात छापेमारी केली आणि या घोटाळ्याशी संबंधित काही कागदपत्रेही जप्त केली. यावेळी संशयित व्यक्तीही तिथे हजर होत्या. (crime news)

बँकांच्या कागदपत्रांचाही आहे घोटाळा

समोर आलेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात खातेवह्यांची फेरफार, स्टॉक स्टेटमेंट्सचा घोळ, बॅलन्स शीटमध्ये पेरफार, पैशांची अफरातफर असे अनेक पैलू आहेत. सीबीआयचे प्रवक्ता आर. के. गौर यांनी माध्यमांना सांगितले, 'असा आरोप केला जात आहे की संशयितांनी बँकेच्या पैशांची अफरातफर केली आणि बँकेने मंजूर केलेल्या कर्जांची रक्कम दुसरीकडे वळवून कॅनरा बँकेसह इतर सदस्य बँकांना ७९२६.०१ रुपयांना फसवले.'