Ducati ने एक मोठी घोषणा केली आहे. Ducati ने आपली नवी 2021 Monster बाईकची घोषणा केली आहे. कंपनीने आपल्या या बाईकचा लूक पूर्णपणे बदलला आहे. नव्या लूक आणि इंजिनसह कंपनी ही बाईक भारतात लॉन्च करणार आहे. ही बाईक पुढच्या वर्षी 2021मध्ये लॉन्च केली जाणार आहे. भारतात या बाईकची किंमत 10 लाखांच्या आसपास असणार आहे.

_______________________

Must Read

1) मराठा आरक्षण : वकिलांची समन्वय समिती जाहीर

2) चर्चेची पाचवी फेरीही निष्फळ ठरल्याने शेतकरी संतापले

3) प्रमुख धर्मस्थळे, महत्त्वाच्या ठिकाणी बंदाेबस्तात वाढ, ६ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

4) वनडेचा ‘डॉन’ बनण्याकडे विराटची वाटचाल

5) रिंकू राजगुरूच्या चाहत्यांसाठी खुशखबर! दिसणार या हिंदी चित्रपटात

6) संजय राऊत यांना रुग्णालयातून डिस्चार्ज

______________________________

Ducati 2021 Monster चे फिचर्स


कंपनीने आपल्या या मिडलवेट स्ट्रीट फायटर मोटरसायकल रेसिंगची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी बनवली आहे. ही बाईक दोन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे. ज्यामध्ये मॉन्स्टर आणि मॉन्स्टर प्लसचा सहाभाग असणार आहे. याचसोबत ग्राहक आपल्या आवडीनुसार, बाईकवर हीटेड ग्रिप आणि डुकाटी मल्टीमीडिया सिस्टमही लावू शकतात.


Ducati 2021 Monster ला पॉवरसाठी 937cc इंजिन लावण्यात आलं आहे. जे 9,250rpm वर 110bhp आणि 6,500rpm वर 93 Nm पीक टॉर्क करतं. बाईकचं वजन कमी 18 किलोंनी कमी करण्यात आलं आहे. त्यासाठी बाईकची नवी फ्रेम Panigale V4 पासून प्रेरिक आहे. ज्यामुळे आता बाईकचं वजन 166 किलो आहे.


Triumph Street Triple R शी होणार स्पर्धा


भारतात Ducati 2021 Monster ची थेट स्पर्धा Triumph Street Triple R सोबत होणार आहे. भारतात याची किंमत 8.84 लाख रुपयांपासून 11.33 लाखांमध्ये असणार आहे. Street Triple R च्या नव्या मॉडेलमध्ये कंपनीने नवीन बॉडीवर्क, फ्लाइस्क्रीन आणि साइड पॅनल यांसारखे खास फिचर्स अॅड केले आहेत. Triumph Street Triple R मध्ये स्ट्रीच ट्रिपल आरएसमध्ये देण्यात आलेलं 765 cc चं इन-लाइन थ्री-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. 

दरम्यान हे इंजिन थोड्या कमी ट्यूनसोबत येत. या बाईकचं इंजिन 12,000 rpm वर 116 bhp ची पॉवर देतं. तर RS चं इंजिन 11,750 rpm वर 121 bhp ची पॉवर देतं. परंतु, टॉर्क दोघांमध्येही समान 9,350 rpm वर 79 bhp असं पाहायला मिळतं. Street Triple RS च्या तुलनेत Street Triple R मध्ये वेगळ्या रॅक आणि ट्रेलमध्ये दिसून आली आहे.