kolhapur local newsForest Department -  पुणे शहरात दोन वेळा गवा घुसल्यानंतर कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये देखील चार गव्यांचे दर्शन नागरिकांना झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर (kolhapur) शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात नागरिकांना गव्याच्या कळपाचे दर्शन झालं. काल रात्री गवे पाहिल्यानंतर आज पहाटे देखील फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उसाच्या शेतात गवे आढळून आले. 

या घटनेनंतर वनविभाग ( Forest Department ), पोलीस दल आणि अग्निशमन दल यांच्याकडून गव्याच्या कळपाचा शोध सुरू झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात उसाची शेती आहे. त्याचबरोबर जंगलाचा भाग देखील येतो. त्यामुळे गावे जंगलातून खाली उतरून उसाच्या शेतीपर्यंत पोहोचले आहेत. आता अग्निशमन दलाने बॅरिकेट लावून या परिसरातील वाहतूक बंद ठेवली आहे. गवे कोल्हापूर (kolhapur) शहरात घुसू नये याच्यासाठी वन विभाग आपली टीम घेऊन त्या ठिकाणी सज्ज झाले आहेत.

-----------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत जानेवारीमध्ये कोरोना लसीकरणाचे नियोजन

2) मी मात्र कोल्हापूरला परत जाणार' : चंद्रकांत पाटला

3) राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांना फोनवरून दिली धमकी

4) सरकारी नोकरीत अव्वल स्थानी असणारे भारताचे 7 स्टार क्रिकेटपटू

-----------------------------------

तीन आठवड्यांपूर्वी (8 डिसेंबर) पुण्यातील कोथरुड भागात सकाळी रानगवा आढळून आला होता. त्यानंतर या गव्याला बघण्यासाठी आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ हातातील मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळली त्यामुळे हा गवा बिथरला आणि सैरावैरा पाळायला लागला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या गव्याला पकडण्यात यश आलं खरं पण या सगळ्या गोंधळात गव्याचा मात्र मृत्यू झाला.