#bigboss14 news#bigboss14- बिग बॉस हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शोंपैकी एक म्हणून चर्चेत असतो. हा रिअॅलिटी शो सुरु होऊन आता आठ आठवडे उलटून गेले आहेत. शो आता फायनलच्या दिशेने जात आहे. परिणामी प्रत्येक स्पर्धक बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी अटितटीचा प्रयत्न करत आहे. दरम्यान अभिनेत्री अर्शी खान आणि अली गोनी यांच्यात मैत्री पलिकडलं नातं निर्माण झाल्याची चर्चा आहे. अलिकडेच अर्शीने सर्वांसमोर अलीला किस केलं. हे दृश्य पाहून त्याची खास मैत्री जॅस्मिन भसीन (#jasminebhasin) संतापली आहे.

----------------------------------------------------

Must Read

1) अजित पवारांनंतर भाजप आमदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला

2) शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सरकारनं सुरू केली ही नवी योजना

3) सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

4) Facebook वरून मैत्री करून फसवणाऱ्या नागरिकाला अटक

5) ईशा गुप्‍ताच्या बाथरूम सेल्फीने सोशल मीडियावर धुमाकूळ

-----------------------------------------------------------------

जॅस्मिन आणि अली (#alygoni) बिग बॉसच्या घराबाहेर एक मेकांना डेट करत होते अशी चर्चा आहे. यापुर्वी अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलं आहे. त्यांनी आपल्या नात्याबाबत अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र शोमधील प्रत्येक टास्कमध्ये ते एकमेकांना भक्कम असा पाठिंबा देताना दिसले. या पार्श्वभूमीवर अर्शी आणि अलीमध्ये निर्माण झालेली जवळीकता प्रेक्षकांना अवाक करणारी आहे.

जॅस्मिननं देखील दोघांना किस करताना पाहून संताप व्यक्त केला. तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती असं म्हणत तिने त्या दृश्याबाबत अलीकडे स्पष्टीकरण मागितलं. बिग बॉस रिअॅलिटी #bigboss14 शोच्या इतिहासात आजवर अनेकदा प्रेम आणि मैत्रीचे त्रिकोण पाहायला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर अर्शी, अली आणि जॅस्मीनमध्ये नेमकं काय घडणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक आता उत्सुक आहेत.