@SrBachchan


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन  (@SrBachchan) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ऑनलाईन ब्लॉग्स, ट्विट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ते कायम चर्चेत असतात. यावेळी अमिताभ चक्क गुलाबजाम आणि रसगुल्ला या गोड पदार्थांमुळे चर्चेत आहेत. बिग बींनी इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट (instagram post) केला आहे. यामध्ये त्यांच्या एका हातात गुलाबजाम दिसतोय तर दुसऱ्या हातात रसगुल्ला.

-------------------------------------------------

Must Read

1) ग्रामपंचायत बिनविरोध करा अन् पंचवीस लाख रूपये मिळवा! आमदारांची ऑफर

2) मोठी घडामोड, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट पत्र

3) रस्त्यात गाडी थांबवून शरद पवारांनी दिले आशीर्वाद

4) ब्लॅकमेल करत तब्बल 21 वर्षे केलं लैंगिक शोषण आणि त्यानंतर...

5) MIM च्या नेत्याने तिघांना घातल्या गोळ्या VIDEO

--------------------------------------------------------

“जेव्हा गोड पदार्थ खाणं थांबवलं तेव्हा या शूटिंगवाल्यांनी माझ्या हातात गुलाबजाम आणि रसगुल्ला दिला. अन् म्हणतायेत या पदार्थांची चव सांगणारं एक्सप्रेशन द्या. आयुष्यात यापेक्षा मोठा टॉर्चर होऊच शकत नाही.” अशा आशयाची कॅप्शन देत अमिताभ  (@SrBachchan)  यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर (instagram post) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी बिग बी कानांच्या कवितेमुळे चर्चेत होते. या कवितेद्वारे त्यांनी आपल्या कानांचं मनोगत सांगण्याचा प्रयत्न केला होता. कान जर खरंच बोलू लागले तर ते काय बोलतील? स्वत:च्या समस्या कशा सांगतील? हे त्यांनी या कवितेद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला. “मैं हूँ कान… हम दो हैं… जुड़वां भाई…, लेकिन हमारी किस्मत ही ऐसी है, कि आज तक हमने अपने दूसरे, भाई को देखा तक नहीं” अशी कविता त्यांनी पोस्ट केली होती.