politics of india


शेतकरी संघटनांनी (farmers) मंगळवारी भारत बंदची हाक दिली होती. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (amit shah) यांनी शेतकरी नेत्यांना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केलं आहे. संध्याकाळी 7 वाजता हे नेते अमित शहा यांना भेटणार आहेत. त्यामुळे गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची कोंडी फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी ही माहिती दिली. आता हे आंदोलन शेवटच्या टप्प्यात असून ही कोंडी लवकर फुटली पाहिजे अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

अमित शहा (amit shah) यांच्या या बैठकीत 13 संघटनांचे प्रतिनिधी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन हे देशव्यापी होत असल्याने सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे अमित शहा पुन्हा एकदा मैदानात उतरले असून ही कोंडी फोडण्यासाठी नवी रणनीती आखली जात आहे.

शेतकऱ्यांच्या (farmers)  आंदोलनादरम्यान (Farmer Movement) आणखी एका शेतकऱ्याचा ह्रदयविकाराने मृत्यू (Farmer Death) झाला आहे. हा शेतकरी टिकरी बॉर्डरवर (Tikri Border) वर प्रदर्शनात सहभागी झाला होता. सोमवारी त्याची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यानंतर त्यांना बहादुरगढ इथल्या एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला. गेल्या 12 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात विविध कारणांमुळे 12 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

कडाक्याची थंडी, दुपारचं उन आणि खाण्यापिण्याची आबाळ यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना त्रास होतोय. त्यातूनच काहींची प्रकृती बिघडली तर काही अपघातामुळे मृत्यूमुखी पडले. मंगळवारी भारत बंदचं आयोजन शेतकऱ्यांनी केलं होतं. त्यामुळे आंदोलन स्थळी जास्त गर्दी झाली आहे.

केंद्र सरकारने मंजूर केलेली नवी कृषी विधेयकं (agriculture law) परत घेण्यात यावीत यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या असून त्यात तोडगा निघालेला नाही. 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात सहाव्यांदा चर्चा होणार आहे. यापूर्वी पाच वेळा झालेल्या चर्चेतून कोणताही निष्कर्ष आलेला नाही. त्यामुळे आता उद्या 9 डिसेंबर रोजी शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.