vehicle documents holder


वाहनचालकांना आणि गाडी नावावर (vehicle documents holder) असलेल्या सर्वांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. करोना कालावधीमुळे नागरिकांची होणारी गैरसोय आणि अडचणी लक्षात घेऊन मंत्री नितीन गडकरी यांच्या वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने काही महत्वाचे निर्देश जारी केले आहेत.

नागरिकांची होणारी परवड आणि अडवणूक लक्षात घेऊन वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय तातडीने लागू केला आहे. त्यानुसार आपल्याकडे आरटीओ कार्यालयाचे नुकतेच मुदत संपलेले किंवा संपणार असलेली कागदपत्रे आता थेट 31 मार्च 2021 पर्यंत वैध असणार आहेत.

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

5) तब्बल 99 टन सोनं मिळाल्याने देशाची अर्थव्यवस्था सुधारणार

6) Vodafone Idea deploys 3G spectrum for 4G services in Mumbai


यामध्ये फिटनेस सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी) यासह महत्त्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे. व्यावसायिक वाहन धारकांनी (vehicle documents holder) सरकारकडे आणखी काही सवलतींसाठी अपील केले होते. व्यावहारिक समस्यांमुळे अद्याप रस्त्यावर नसलेल्या वाहनांना आणखी सवलत देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी सरकारला केली होती. यामध्ये स्कूल बस चालकांचाही समावेश आहे.