raju shettiकेंद्र सरकारच्या कृषी विधेयकाला (agriculture law) विरोध दर्शवण्यासाठी पुकारण्यात आलेल्या भारत बंदला आज जिल्ह्यात प्रतिसाद मिळत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत जिल्ह्यातील बहुतांशी बाजारपेठा बंद होत्या. कोल्हापूर (kolhapur) बाजारसमितीत गुळासह भाजीपाला, कांदा बटाटा बाजारही बंद राहिल्याने दररोजची लाखो रुपयांची उलाढाल ठप्प होती.

__________________________

Must Read

1) सूत दरवाढीविरोधात प्रांताधिकाऱ्यांना गाऱ्हाणे

2)भारत बंद : राज्यात कामगार-बँक संघटना, व्यापारी यांचा पाठिंबा... पण

3) विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेमध्ये मोठा गैरप्रकार

4) विराट कोहलीने रचला इतिहास, वाचा काय आहे हा विक्रम

5) Airtelची उत्तम योजना! दररोज 3 जीबी डेटा, फ्री कॉलिंग आणि Disney+ Hotstar VIP कमी किमतीत उपलब्ध

_______________________________

शाहूपुरी, लक्ष्मीपूरी या व्यापारी पेठांमध्येही बंदचा परिणाम जाणवला. दररोजची वर्दळ जाणवली नाही. बंदची कल्पना असल्याने मध्यवर्ती बसस्थान परिसरातही बसेसची तुरळक वर्दळ राहिली. मालवाहतूक वगळता अन्य प्रवासी वाहतूकीवर परिणाम झाल्याचे दृष्य सकाळी दहा वाजेपर्यंत होते. शेकार्‍यांना त्यांचा हक्क मिळाला नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील असा इशारा राजू शेट्टीनी दिला आहे.

दरम्यान शिरोळ येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी या विधेयकाचा (agriculture law) निषेध करीत विधेयकांच्या प्रतींची होळी केली. हे विधयक शासनाने तातडीने मागे घ्यावे अशी विनंती श्री शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी सर्वांनी एकजूट होवून निषेध नोंदविल्याबद्दल श्री शेट्टी यांनी आंदोलनात सहभागी घटकांचे अभिनंदन केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, कोल्हापूर बाजार समिती, गूळ, भाजीपाला मार्केट, राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, सराफ बाजारही बंद ठेवून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे. त्याशिवाय जिल्ह्यातून विविध संघटना, पक्ष, संघ, व्यापारी, उद्योजक पाठबळ देत आहेत.