gauahar khanbollywood gossip-  गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांच्या निकाहची चर्चा सुरु होती. निकाहपूर्वी आणि त्यानंतर रंगलेल्या प्रत्येक सोहळ्याचे फोटो या दोघांनी सोशल मीडियावर शेअर (viral on social media) केले होते. २५ डिसेंबर रोजी या दोघांचा निकाह झाला. निकाहच्या फोटोमुळे गौहर चर्चेत होती. मात्र, गौहर आता तिच्या लग्नामुळे नाही तर लग्नाच्या दोन दिवसानंतर तिच्या एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनला भेटल्याने ती चर्चेत आली आहे.

गौहर निकाहच्या दोन दिवसानंतर लखनऊला चित्रीकरणासाठी गेली. त्यावेळी विमानातील प्रवासादरम्यान गौहरला तिचा एक्स बॉयफ्रेंड कुशाल टंडनशी अचानक भेट झाली. कुशलने या भेटीला व्हिडीओ इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केला. 

Must Read

1) कळंबा कारागृह मोबाइल प्रकरणात इचलकरंजीने पाच जणांची चौकशी

2) कोल्हापुरात निवडणुकीनंतर महाविकास आघाडी: सतेज पाटील

3) भारताला सुरुवातीलाच दोन धक्के

4) अर्ध्या वयाच्या मुलाशी प्रेमसंबंधाचा शेवट

“मी माझ्या घरी जात होतो आणि अचानक माझ्या एका जुन्या मैत्रिणीची भेट झाली. तिचं नुकतंच लग्न झालं आहे आणि ती खूप सुंदर दिसत आहे. ही मैत्रीण आहे गौहर खान. मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे. हाय किस्मत”, असं तो या व्हिडीओत बोलताना (viral on social media) दिसतो.
गौहर आणि कुशालने बिग बॉसच्या सातव्या पर्वात भाग घेतला होता. यावेळी दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. बिग बॉसनंतरही हे दोघं अनेकदा एकत्र दिसायचे. पण त्यांचं हे अफेअर फार काळ टिकलं नाही.