actor-aditya-roy-kapur-returns-to-action

बॉलिवूड स्टार आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) लवकरच ओम : द बॅटल विदीन (OM : The Battle Within) या सिनेमात झळकणार आहे. त्यानं सिनेमाची शूटिंग पूर्ण केली आहे. आदित्यनं सिनेमाचा फर्स्ट लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोत आदित्य फायटरच्या गेटअपमध्ये दिसत आहे. सध्या त्याच्या या फर्स्ट लुकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आदित्यनं त्याच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. ओम या त्याच्या आगामी सिनेमाचं हे पोस्टर आहे. यात आदित्य एका फायटरच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याच्या हातात बंदूकही दिसत आहे. आदित्य एका सोल्जरसारखा दिसत आहे.


फोटो शेअर करत करताना आदित्यनं लिहिलं की, फायटिंगची भावना टिकवून ठेवण्यासाठी आपल्या आतली लढाई. पुढील वर्षी उन्हाळ्यात रिलीज होणार आहे. कपिल वर्मा सिनेमाचं डायरेक्शन करत आहे. अभिनेत्री संजना संघी (Sanjana Sanghi) सिनेमात फीमेल लिड साकारत आहे. सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) सोबत दिल बेचारा (Dil Bechara) मधून डेब्यू केल्यानंतर संजनाचा हा दुसरा लिड सिनेमा आहे.

आदित्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याचे 3 सिनेमे रिलीज झाले आहेत. यापैकी मलंग सिनेमा थिएटरमध्ये रिलीज झाला होता, तर लुडो आणि सडक 2 हे सिनेमे ओटीटीवर रिलीज झाले होते. लवकरच आता तो ओम : द बॅटल विदीनमध्ये झळकणार आहे.