Jaysingpur शहरातील जयसिंग नगरमध्ये तीन पानी जुगार खेळणाऱ्या (gambling) सात महिलांसह एका पुरुषावर कारवाई करण्यात (crime news)आली. यावेळी 37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईमुळे शहरात जुगार खुलेआम सुरु असल्याचे स्पष्ट झाले आहे.
1) विधान परिषद निवडणूक : भाजपला धक्का
2) फ्रान्समधली विजय माल्याची १४ कोटींची मालमत्ता जप्त
3) हा स्टार खेळाडू T-20 सीरिजमधून बाहेर
4) मराठा आरक्षणाबाबत मोठी बातमी, या दिवशी न्यायालयात होणार सुनावणी
मीना किरण काळे (वय 40, रा. संभाजीनगर, धोत्रे यांच्या घरी भाड्याने, जयसिंगपूर), छाया जगनू लोंढे (वय 30, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, सिव्हील हॉस्पिटलजवळ सांगली), हेमा धर्मेंद्र कसबेकर (वय 40, रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), सुरेखा राजू नरंदेकर (वय 40, रा. केर्ली सध्या रा. टेंबलाई नाका झोपडपट्टी कोल्हापूर), वर्षा इकबाल लोंढे (वय 35, रा. कोरोची ता. हातकणंगले), ज्योती नामदेव पाटील (वय 70, रा. समडोळी मळा, जयसिंगपूर), बेबी दौलत शेख (वय 45, रा. संभाजीनगर झोपडपट्टी, जयसिंगपूर), अर्जुन कल्लाप्पा वसगडे (वय 53, रा. मंगेश्वर कॉलनी उचगाव ता. करवीर) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
37 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात रोख रक्कम व साहित्याचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस हेडकॉन्टेबल शहनाज आलम कनवाडे यांनी जयसिंगपूर पोलिसात (crime news) घटनेची फिर्याद दिली आहे. अधिक तपास सावंत करत आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून शहर आणि परिसरात अवैध धंद्यावर कारवाईचा धडाका लावला आहे. याआधी सुमारे अडीच लाखाच्या गुटख्याचा साठा जप्त केला होता. गावठी दारुभट्ट्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अवैध धंद्यावर कारवाईचा सपाटा लावण्यात येत असल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यपध्दतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.