highway accident


रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कवठेमहांकाळ तालुक्‍यात विठ्ठलवाडी गावाजवळ मोटारसायकल व आयशयर टेंपो यांच्यात समोरासमोर झालेल्या आपघातात (highway accident) दोन जण ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. रोहण चिदानंद येनपे (वय २८) व त्यांचा मुलगा शुभम ( वय- ४ , रा. इंदिरानगर, सांगली) ठार झालेल्यांची नावे आहेत. 

घटनास्थळी व पोलिसांतून समजलेली माहिती अशी दुपारी साडेतीनच्या सुमारास मोटारसायकल क्रमांक एम.एच.१३-सीव्ही.३२७६ वरुन रोहण येनके हे आपली पत्नी भाग्यश्री वय २३ वर्षे, मुलगा शुभम वय ४ वर्षे व मुलगी आरती वय ३ वर्षे असे एका मोटारसायकलवरून सांगोल्यावरून सांगलीच्या दिशेने चालले होते, तर आयशयर टेंपो क्रमांक एम.एच.१३-आर.३२७९ हा मिरजकडून पंढरपूरच्या दिशेने जात होता. विठ्ठलवाडी गावाजवळ उथळे पेट्रोल पंपाजवळ दोघांची समोरासमोर जोरदार धडक झाली.

----------------------------------------------------

Must Read

1) मोठी बातमी : एल्गार परिषदेला पोलिसांनी परवानगी नाकारली

2) मराठा समाजाला राज्य सरकारचा दिलासा

3) SC, ST विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज!

4) हेअरकटनंतर व्हायरल झाला फोटो, तब्बल 10 वर्षांनंतर झाली कुटुंबीयांची भेट

5) सुरेश रैनाने मागितली माफी, 'त्या' रात्रीची पूर्ण कहाणी समोर

6) मलम लावण्याच्या बहाण्याने तरुणीच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श

--------------------------------------------------------

धडक देऊन टेंपो पाचशे मीटरवर जाऊन थांबला, त्यात मोटारसायकलीवरील रोहण व मुलगा शुभम हे दोघे जागीच ठार (highway accident) झाले, तर त्यांची पत्नी भाग्यश्री व मुलगी आरती गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. टेंपोचालक विकास वराडे राहणार (वडदेगाव ता.मोहळ जिल्हा.सोलापूर) हा पेंड वाहतुकीचा व्यवसाय करतो. त्याला निष्काळजीपने  वाहन चालवल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची नोंद पोलिसांत झाली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.