इचलकरंजी येथे कोविड (Kovid) काळात केलेल्या कामाचे मानधन तातडीने देण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर संघटनेच्यावतीने आशा कर्मचार्यांनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात जोरदार निदर्शने केली. दरम्यान, सोमवारपर्यंत सर्वच आशा कर्मचार्यांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी दिले. तर 11 डिसेंबरपर्यंत मानधन जमा न झाल्यास 12 डिसेंबरपासून आशा वर्कर्स कामबंद आंदोलन करतील असा इशारा कॉ. सदा मलाबादे यांनी दिला.
___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
शहरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रत्यक्ष घरोघरी जावून सर्व्हे करणे, माहिती घेणे यासाठी आशा कर्मचार्यांना एप्रिल महिन्यांपासून काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आशा कर्मचार्यांनी घरोघरी जावून सोपविलेली जबाबदारी योग्यरितीने पार पाडली. 16 सप्टेंबर रोजी झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत एप्रिल महिन्यापासून कार्यरत आशा कर्मचार्यांना दरमहा तीन हजार रुपये मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
जीवाची पर्वा न करता काम करुनही मानधन मिळत नसल्याने कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर संघटना (सिटू) चे कॉ. सदा मलाबादे यांच्या नेतृत्त्वाखाली आशा वर्कर्सनी नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारात ठिय्या मारत जोरदार निदर्शने केली.
त्यानंतर नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी शिष्टमंडळाला बोलावून या प्रश्नी चर्चा केली. त्यावेळी मुख्याधिकारी संतोष खांडेकर, पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते. चर्चेअंती येत्या सोमवारपर्यंत आशा कर्मचार्यांच्या खात्यावर मानधन जमा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. त्यावर 11 डिसेंबरपर्यंत मानधन न मिळाल्यास 12 डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या आंदोलनात सावित्री कुंभार, नंदिनी करडे, जलवंती भंडारे, वैशाली माने यांच्यासह आशा कर्मचारी सहभागी झाल्या होत्या.