Suicide-by-strangulation

(Suicide) इचलकरंजी येथील स्वामी अपार्टमेंट परिसरात राहणार्‍या अल्पवयीन मुलीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. प्रिती चंद्रकांत वडे (वय 16) असे तिचे नांव आहे. याबाबतची वर्दी चंद्रकांत गजानन वडे (वय 42) यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

जवाहरनगर येथील स्वामी अपार्टमेंट परिसरात चंद्रकांत वडे हे मुलगी प्रिती व मुलगा प्रणव यांच्यासह राहण्यास आहेत. चंद्रकांत हे कामावर गेले होते. दरम्यान प्रिती हिने घरात कोणी नसल्याचे पाहून स्लॅबच्या हुकाला ओढणीने गळफास (Suicide)  घेऊन आत्महत्या केल्याचे शेजार्‍यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबतची माहिती चंद्रकांत वडे यांना दिली. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. अधिक तपास सपोनि रुपाली पाटील करत आहेत.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------