Pune graduate and teacher voters

(Ichalkaranji news) पुणे पदवीधर (Pune graduates) व शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी मंगळवारी इचलकरंजीत उत्साहात मतदान पार पडले. आपलाच उमेदवार विजयी व्हावा यासाठी नेतेमंडळी जोमाने कामाला लागली होती. पदवीधर मतदार संघासाठी सुमारे 75 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.90 टक्के मतदान झाले. खासदार धैर्यशील माने, माजी आमदार अशोकराव जांभळे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर आदींसह विविध नेतेमंडळींनी मतदानाचा हक्क बजावला.

मतदानासाठी शहरातील गोविंदराव हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, आ. रा. पाटील शाळा, विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर या चार ठिकाणी मतदान केंद्रे होती. सर्वच मतदान केंद्रावर मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राज्यातील सत्तेत असणार्‍या शिवसेना-राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँग्रेस आणि विरोधी पक्षातील भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या अन्य राजकीय पक्षांचे तसेच अपक्ष मिळून 65 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मुख्यत्वे महाविकास आघाडी विरुध्द भाजपा अशीची चुरशीची व प्रतिष्ठेची निवडणूक बनली आहे.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------

शिक्षक मतदार संघासाठी विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर येथे दोन मतदान केंद्रे होती. त्यामध्ये एका मतदान केंद्रावर 83.20 टक्के तर दुसर्‍या मतदान केंद्रावर 88.60 टक्के असे मिळून सरासरी 85.90 टक्के मतदान झाले. यामध्ये 1027 मतदारांपैकी 884 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामध्ये 581 शिक्षक आणि 303 शिक्षिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

पदवीधर मतदार संघासाठी 13 मतदान केंद्रे होती. त्यामध्ये गोविंदराव हायस्कूल येथील तीन केंद्रात अनुक्रमे 583 पैकी 393, 636 पैकी 443 आणि 629 पैकी 424 असे एकूण 1848 पैकी 1260 मतदान झाले. व्यंकटराव हायस्कूल येथील चार केंद्रापैकी एका केंद्रावर 567 पैकी 408, दुसर्‍या केंद्रावर 416 पैकी 313, तिसर्‍या केंद्रावर 406 पैकी 247 आणि चौथ्या केंद्रावर 579 पैकी 408 असे एकूण 1968 पैकी 1376 म्हणजे 70 टक्के मतदान झाले. आण्णा रामगोंड पाटील शाळेत चार केंद्रापैकी एका केंद्रावर 389 पैकी 290, दुसर्‍या केंद्रावर 381 पैकी 240, तिसर्‍या केंद्रावर 679 पैकी 462 आणि चौथ्या केंद्रावर 585 पैकी 421 असे एकूण 2034 पैकी 1463 इतके मतदान झाले. तर विठ्ठल रामजी शिंदे विद्या मंदिर येथील 2 केंद्रापैकी एका केंद्रावर 358 पैकी 258 आणि दुसर्‍या केंद्रावर 350 पैकी 245 असे एकूण 708 पैकी 503 इतके मतदान झाले. म्हणजेच एकूण 6558 पैकी 4602 पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

कोरोना महामारीची दुसरी लाट उद्भवण्याची शक्यता गृहीत धरुन  संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने सुरक्षिततेचे उपाय योजले होते. प्रत्यक मतदन केंद्रावर मतदारांचे स्क्रिनिंग व ऑक्सिजन लेवल तपासली जात होती. तसेच सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क याची कडक अंमलबजावणी करण्यात येत होती. शहरातील विविध मतदान केंद्रांना प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्यासह अधिकार्‍यांनी भेटी देत नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देत होते.

मतदान केंद्र परिसरात उभारण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या बुथवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सतेज पाटील यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांसह बुथना भेटी देऊन माहिती घेतली. तर उमेदवार संग्रामसिंह देशमुख, अरुण लाड, प्रा. जयंत आसगांवकर आदींनी शहरातील प्रमुख केंद्रांना भेटी दिल्या. त्याचबरोबर नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक सागर चाळके, मदन कारंडे, प्रकाश मोरबाळे, शशांक बावचकर, धोंडीराम जावळे, राजाराम धारवट, भाजपा शहराध्यक्ष अनिल डाळ्या, संभाजी नाईक, प्रकाश पाटील आदी लक्ष ठेवून होते. मतदान केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या निवडणुकीत शांततेत मतदान पार पडल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, काही मतदारांची नांवे मतदार यादीतून गायब झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे संबंधितांना मतदान करण्यास निवडणूक यंत्रणेने मज्जाव केला. त्याचा जाब विचारण्यावरुन किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.