अनैसर्गीक व भरमसाठ सूतदर वाढल्यामुळे यंत्रमाधारक (Machine holder) अडचणीत आलेले आहेत. शहरात काही दिवसांपासून दररोज अनैसर्गिकरित्या सुरु असलेल्या या सूत दरवाढीच्या विरोधात यंत्रमागधारकांच्यावतीने शनिवार 5 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 वाजता शिवाजी उद्यान येथे निदर्शने करण्याचा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
___________________________
Must Read
1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक
3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं
4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर
5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले
6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...
_____________________________
गत दोन महिन्यांपासून सूत दरामध्ये भरमसाठ वाढ केली जात आहे. परंतू त्या प्रमाणात कापडाला दर मिळत नसल्याने यंत्रमाग उद्योजकांना नुकसानीतच कापड विकावे लागत आहे. सूत गोडावून भरलेली असून सूत बाचकी ठेवणेस जागा नाही. तरीदेखील सूताचा साठा करून व्यापारी सूत दरामध्ये भरमसाठ वाढ करीत आहेत.
सुताच्या काऊंटमध्ये तफावत, वजनामध्ये तफावत, दिली जाणारी बिले घेतलेल्या सुतापेक्षा वेगळ्या काऊंटची देणे अशा चुकीच्या पद्धतीने व्यापार करींत आहेत. याला विरोध करणेसाठी पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी शिवाजी उद्यान येथील सूत मार्केट येथे निदर्शने करणेत येणार आहेत.
पॉवरलूम असोशिएशनच्या (Powerloom association) कार्यालयात झालेल्या बैठकित सतीश कोष्टी, सागर चाळके, प्रकाश मोरे, राजाराम धारवट, राजगोंडा पाटील, पांडूरंग धोंडपूडे, विनय महाजन, विश्वनाथ मेटे, विनोद कांकानी, दत्तात्रय कनोजे, चंद्रकांत पाटील, पांडूरंग सोलगे, प्रकाश गौड, सुरज दुबे, महेश दुधाणे, जनार्दन चौगुले, श्रीशैल कित्तूरे, बंडोपंत लाड व कारखानदार उपस्थित होते.