Election-in-Kolhapur

(Kophapur News) कोल्हापूर महापालिका (Kolhapur Municipal Corporation) निवडणूक महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली लढवली जाणार नाही. अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी जाहीर केली. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस स्वतंत्रपणे लढतील, आवश्यकता वाटल्यास निवडणुकीनंतर महाविकास आघाडी स्थापन करु, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. त्यामुळे महापालिका निवडणुकीत आघाडी होणार ? या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. एका संस्थेच्या शुभरंभ प्रसंगी प्रसारमाध्यामांशी ते बोलत होते.

जिल्ह्यातील शिवसेनेने यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला आहे. तर मंत्री हसन मुश्रीफ यांनीही राष्ट्रवादी स्वतंत्र लढेल असे यापूर्वीच सांगितले आहे. दोन्ही घटक पक्षांची त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे आघाडी होणार नाही. हे स्पष्ट असल्याने काँग्रेस स्वता:च्या ताकदीवर लढेल. निवडणुकीनंतर मात्र आम्ही एकत्र येवू अशी भूमिका मांडली. ग्रामपंचायत निवडणुकीवरही त्यांनी भाष्Î केले. ते म्हणाले ग्रामीण भागात गटतट असतात. स्थानिक पातळीवरील परिस्थितीनुसार निवडणूक लढवल्या जातील. काही झाले तरी जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आपआपले गड राखतील आम्हीच टॉपवर असू असा विश्वास व्यक्त केला. (Kophapur News) चंद्रकांत् दादांना भाजपमधील विरोधकांना कोल्हापूरला परत जाणार आहे. असे सांगायचे असेल असा टोलाही त्यांनी एका प्रश्नावर हाणला. सत्ता टिकत नसते, संस्था टिकत असतात त्यांच्यावरील विश्वास टिकला पाहिजे असे म्हणत इडी, सीबीआयचे नेमके काम काय हे एकदा स्पष्ट झाले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.