sheetal-amte-karajgi-suicide-case-sheetal-amte

(Suicide case) ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे (Baba Amte) यांची नात आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ.शीतल आमटे-करजगी (sheetal amte karajgi) यांच्या आत्महत्येप्रकरणी नवीन माहिती समोर आली आहे. याआधी सुद्धा शीतल आमटे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची  धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच त्यांचा मृत्यूबद्दल घातपाताची शक्यता नाकारण्यात आली आहे.

शीतल आमटे आत्महत्या प्रकरणाला तब्बल महिनाभरानंतरही पोलीस तपासात अल्प प्रगती पाहण्यास मिळाली आहे.  पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी  पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी शीतल आमटे यांचा मृत्यू हा श्वास गुदमरून झाल्याचा निष्कर्ष प्राथमिक अहवालात काढण्यात आला आहे.  व्हिसेरा आणि अन्य काही गोष्टी अजूनही तपासासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. पण, डॉ. शीतल यांचा मृत्यू घातपात नसल्याची माहिती ही त्यांनी दिली.

जून 2020 मध्ये डॉ. शीतल यांनी झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी नवी माहितीही पोलिसांनी दिली. घटनास्थळी कुठलीही सुईसाईड नोट नसल्याचा खुलासा करण्यात आला आहे. टॅब-मोबाईल-लॅपटॉप यांचा प्रयोगशाळा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. अल्सर झालेल्या कुत्र्यांना संपविण्यासाठी 3 प्रकारचे इंजेक्शन मागवण्यात आले होते. (Suicide case) त्यातील एक रिकामे सॅम्पल मिळाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. विविध अहवाल प्रतिक्षेत असल्यामुळे शीतल आमटे यांच्या मृत्यूबाबत निष्कर्ष काढणे शक्य नसल्याचेही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे  यांनी सांगितले.

-----------------------------------------

Must Read

1) कोल्हापुरातील संवेदनशील 80 गावांत कडेकोट बंदोबस्त

2) शिवसेनेला रोखण्यासाठी नवी सत्ता समीकरणे?

3) महाराष्ट्रातला सर्वात मोठा दरोडा

4) पुणेकरांना खूशखबर,PMPMLच्या ताफ्यात 150 इलेक्ट्रिक बसेस

5) पोलीसदादांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी उचलले महत्त्वाचे पाऊल

-----------------------------------------

शीतल आमटे आणि सामाजिक काम

डॉ. शीतल आमटे या विकास आणि भारती आमटे यांच्या कन्या होत्या. 2003 मध्ये नागपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं शिक्षण घेतलं होतं. त्या एक उत्तम फोटोग्राफर सुद्धा होत्या. जानेवारी 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक मंचद्वारे 'यंग ग्लोबल लीडर 2016' साठी त्यांची निवड झाली होती. एप्रिल 2016 मध्ये संयुक्त राष्ट्राकडूनही नवोदित राजदूत म्हणूनही शीतल आमटे यांची निवड करण्यात आली होती.

वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर शीतल आमटे यांनी कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा जोपासण्यासाठी आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे, शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या. त्यानंतर त्यांनी महारोगी सेवा समितीची सर्व सूत्र आपल्या हाती घेतले होते.

कौटुंबिक वाद

मध्यंतरीच्या काळात शीतल आमटे यांनी फेसबुकवर लाईव्ह येत आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल आणि संस्थेतील विश्वस्तांबद्दल नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली होती. पण, दोन तासांनंतर त्यांचा फेसबुकवरील हा व्हिडीओ डिलीट करण्यात आला होता. त्यांच्या या व्हिडीओमुळे आमटे कुंटुंबातील वादावर चर्चा रंगली होती. परंतु, आमटे कुटुंबाकडून एक पत्रक प्रसिद्ध करून सर्व आरोप फेटाळून लावण्यात आले होते.