(ichalkaranji News) इचलकरंजी येथे बेकायदेशीरित्या विविध कंपन्यांच्या मद्याची विक्री (Sale of alcohol) करत असताना पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने एकाला रंगेहात पकडले. अमर तुकाराम बडे (वय 30 रा. योगायोगनगर) असे त्याचे नांव आहे. त्याच्याकडून 60 हजार रुपये किंमतीची मोपेड, 6 हजार रुपयांचा मोबाईल आणि 1 हजार 570 रुपयांचा मद्यसाठा असा 67 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल संतोष विश्‍वास साळुंखे यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, पोलिस उपअधिक्षम महामुनी यांना संतमळा परिसरात एक व्यक्ती मद्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्याची खात्री करुन त्यांनी पथकाला योग्य त्या सूचना देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले. (ichalkaranji News)  त्यानुसार पथकाने छापा टाकला असता अमर बडे हा मोपेडवर बसून मद्याची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्याला पकडून त्याची झडती घेता त्याच्याकडे विविध कंपन्याच्या 1570 रुपयांच्या मद्याच्या बाटल्या मिळून आल्या. त्यासह मोपेड आणि मोबाईल मिळून 67 हजार 570 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी बडे याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(इ) प्रमाणे गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------------------------

Must Read

1) इचलकरंजीत पाण्यासाठी महिला आक्रमक

2) ऊर्मिला मातोंडकर यांचा आज शिवसेनेत प्रवेश

3) नव्या कायद्याच्या समर्थनार्थ जाेरदार बॅटींग

4) AUSvsIND : ग्लेन मॅक्सवेलने खेळलेल्या फटक्यावर बंदी घालणे गरजेचे

5) यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या

6) कर नाही तर, सरनाईकांना ईडी चौकशीची भीती का?

------------------------------------------