इचलकरंजी येथील न्यायालयाच्या आवारातच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न (Attempted suicide) केल्याप्रकरणी गावभाग पोलिसात अमर निवृत्ती मगदुम (रा. वेताळ पेठ) व त्यास मदत करणारा आरीफ बशीर मोमीन (रा. वेताळ पेठ) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती सपोनि गजेंद्र लोहार यांनी दिली.

___________________________

Must Read

1) अभिनेता स्वप्नील जोशीचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक

2) HDFC बँकेला मोठा झटका!

3) हरभजनने केली कोरोना लसीची मस्करी, IPS अधिकाऱ्याने सुनावलं

4) PUBG Mobile India भारतात लॉन्च होणार का नाही? कंपनीने दिलं उत्तर

5) विराटच्या सहाय्यकाचे अखेर विलगीकरण संपले

6) लॉकडाऊनमध्ये सेक्स टॉईजचा बाजार वाढला...हे शहर आघाडीवर...

_____________________________

29 नोव्हेंबर रोजी आवळे गल्ली येथील एका घरात सुरु असलल्या जुगार क्लबवर कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या  (Local Crime Investigation Branch) पथकाने छापा टाकला होता. त्यामध्ये अमर मगदूम यालाही अटक करण्यात आली होती. मगदुम याने बुधवारी सायंकाळी येथील  न्यायालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित पोलिस व नागरीकांच्या सतर्कतेमुळे तो बचावला. 

मगदूम याला पोलिसांनी ताब्यात घेत उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. जुगार क्लबवरील कारवाईनंतर पोलिसांकडून दिली गेलेली वागणूक व करण्यात आलेले मुंडण या नैराश्येतूनच मगदुम याने हे कृत्य केल्याची चर्चा होती.

या प्रकरणी गावभाग पोलिसात सहाय्यक फौजदार जितेंद्र धोंडीराम फडतरे यांनी फिर्याद दिली असून अमर मगदुम व आरिफ मोमीन हे स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच 09 एएस 7382) वरून न्यायालयात आले. दारुच्या नशेत विनाकारण रॉकेल ओतून घेऊन मगदुम याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तर मोमीन याने त्याला मदत केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.