Agarwal-and-three-others-arrested

(Ichalkaranji Crime) शहरात सुरु असलेल्या अवैध मोबाईल ऑनलाईन मटका (Online potअड्डा आणि मटकाबुकीवर पोलिसांनी शनिवारी सांयकाळी छापा टाकला. या छाप्यात इचलकरंजीतील बडÎा मटकाकिंगसह त्यांचा दिवाणजी आणि एंजट असा तिघांना रंगेहाथ पकडून अटक केली. त्यांच्याकडून 76 हजार 950 रुपयांची रोकड, 6 मोबाईल हॅण्डसेट आणि 1 दुचाकी असा सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी केली. याप्रकरणी गावभाग पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

अटक केलेल्यांच्यामध्ये मटकाकिंग सुभाष अग्रवाल, दिवाणजी प्रसाद निंबाळकर, एजंट विनायक घट्टे (सर्व रा. इचलकरंजी) तिघांचा समावेश आहे. अग्रवाल यांने आपल्या मटकाचे जाळे पश्चिम महाराष्ट्रसह कर्नाटकातील निपाणी आणि चिक्कोड्डी तालुक्यात पसरले आहे. तसेच त्याला मटका व्यवसायात सेटजी म्हणून ओळखले जात आहे. (Ichalkaranji Crime) त्याला अटक केल्याची माहिती समजताच पश्चिम इचलकरंजीसह जिह्यातील मटकाबुकीची शर्टर त्वरीत बंद झाली.

Must Read

1) सुदर्शन पाटील यांचा दोनशे कार्यकर्त्यांसह सतेज पाटील गटात प्रवेश

2) कोल्हापूर: एकाच दिवशी नऊ सावकारांवर छापे

3) मोठी बातमी! क्रिकेट घोटाळाप्रकरणी 12 कोटींची संपत्ती जप्त

4) 'Pfizer ची कोरोना लस घेतली तर स्त्रियांना दाढी येईल

5) Aadhar च्या माध्यमातून Free मध्ये तयार करा Pan Card, हा आहे सोपा मार्ग

पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या पथकातील पोलीस नाईक सुनिल पाटील, सागर हारुगले, सदाम शेख, कॉन्स्टेबल सांळुखे आदीच्या पथकाला शहरात बेकायदेशिरपणे मोबाईलवरुन ऑनलाईन मटका घेतला जात असल्याची माहिती बातमीदाराकडून समजली. त्यावरुन या पथकाने जवाहरनगरातील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकालगत सुरु असलेल्या मोबाईल ऑनलाईन मटक्याच्या अडÎावर छापा टाकला. त्यावेळी मोबाईलवरुन ऑनलाईन मटका घेत असलेला विनायक घट्टे याला पकडून अटक केली. त्यांच्याकडून 1 हजार 950 रुपयांची रोकड आणि 1 मोबाईल हॅण्डसेट असा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत तो शहरातील बडा मटकाकिंग सुभाष अग्रवाल याच्या सांगण्यावरुन मटका घेत असल्याचे उघड झाले. त्यावरुन पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांनी अग्रवाल यांच्या शहरातील आसरानगरालगत असलेल्या फॉर्म हाऊसवर छापा टाकला असता तो आणि त्याचा दिवाणजी निंबाळकर हे दोघे जण मोबाईलवरुन ऑनलाईन मटका घेत असताना मिळून आले. या दोघांनी अटक करीत त्यांच्याकडून 75 हजारांची रोकड, 5 मोबाईल हॅण्डसेट, 1 दुचाकी असा सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

कोल्हापूरातील यादवनगरामधील मटकाबुकी मालक सलीम मुल्लाच्या बुकीवर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी ऐश्वर्या शर्मा यांचे पथकावर गेले असता त्यांच्या पथकावर मुल्ला आणि त्यांच्या टोळीतील लोकांनी हल्ला केला होता. या हल्याची तत्कालीन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी गांभीयार्न दखल घेवून मुल्लासह त्यांच्या टोळीतील 44 जणावर मोकातंर्गत कारवाई केली. या कारवाईत इचलकरंजीतील मटकाबुकी राकेश अग्रवाल, त्यांचा भाऊ मनिष अग्रवाल या दोघांना अटक केली असून ते दोघे सध्या कारागृहाची हवा खात आहे. त्यांच्या अटकेनंतर त्यांच्या मटका व्यवसाय त्याचा भाऊ सुभाष अग्रवाल पाहत होता. दिवाळीपूर्वी पोलिसांनी त्याच्या बुकीवर छापा टाकला होता. त्यावेळी पोलिसांना चकवा देवून तो पसार झाला होता. पण आजच्या कारवाईत तो पोलिसांच्या हाती रंगेहथ सापडला.